Happy Birthday Prabhas : बाहुबली नव्हे तर 'या' पाच चित्रपटांमुळे प्रभास सुपरहिट

वृत्तसंस्था
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

बाहुबली आणि नुकताच आलेला साहो या चित्रपटांमुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. मात्र, त्याआधी 15 वर्षांची कारकिर्द असलेल्या प्रभासने अनेक फ्लॉप चित्रपट दिले. अशा या डार्लिंग प्रभासचा आज 40वा वाढदिवस आहे. बाहुबली आणि साहोमुळे नावारुपाला आलेल्या प्रभासला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा स्टार बनविणारे हे पाच चित्रपट तुम्हाला माहित आहेत का? 

एस एस राजामौली आणि त्यांचे सहकारी यांच्यामुळे बाहुबली : दि बिगिनिंग हा चित्रपट लंडनमधील रॉयल अर्लबर्ट हॉलमध्ये झळकणारा इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषेतील पहिला चित्रपट होता. या कार्यक्रमाला सर्वांत जास्त भाव खाऊन गेला तो म्हणजे चित्रपटाचा नायक प्रभास. बाहुबलीच्या जगभर झालेल्या गवगव्यामुळे प्रभास आता फक्त भारतीय चाहत्यांच्याच गळ्यातील ताईत उरलेला नाही. 

Image result for prabhas bahubali hd images

बाहुबली आणि नुकताच आलेला साहो या चित्रपटांमुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. मात्र, त्याआधी 15 वर्षांची कारकिर्द असलेल्या प्रभासने अनेक फ्लॉप चित्रपट दिले. अशा या डार्लिंग प्रभासचा आज 40वा वाढदिवस आहे. बाहुबली आणि साहोमुळे नावारुपाला आलेल्या प्रभासला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा स्टार बनविणारे हे पाच चित्रपट तुम्हाला माहित आहेत का? 

वर्षम (2003) 

आपल्या हॅण्डसम लूकसह प्रभासने पहिल्या दोन चित्रपटात जीव ओतून काम केले मात्र, त्याचे हे दोन्ही चित्रपट फ्लॉप झाले. त्यानंतर मात्र, त्याचाय तिसरा चित्रपट वर्षम तेलुगू चाहत्यांमध्ये खूप गाजला आणि त्याच्या कारकिर्दीतील पहिला ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटात त्याच्यासह त्रिशा क्रिष्णन, गोपीचंद आणि प्रकाश राज यांनी त्याच्यासोबत काम केले आहे. 

छत्रपती (2005)

एस एस राजामौली आणि प्रभास यांचा हा पहिला एकत्र चित्रपट आणि या दोघांनीही चाहत्यांनी नाराज केले नाही. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कामगिरी केली आणि प्रभासला नव्याने नावारुपाला येणाऱ्या कलाकारांमध्ये नेऊन ठेवले. 

डार्लिंग (2010)

करुणाकरण यांच्या या चित्रपटामध्ये त्याने चॉकलेट बॉयची भूमिका केली. काजल अगरवाल आणि प्रभास यांची जोडी आणि
चांगली कॉमेडी यांच्या जोरावर या चित्रपटाने चांगली कामगिरी केली. या चित्रपटाचे संगीत जीव्ही प्रकाश कुमार यांनी दिले होते. फॅमिली एंटरटेनर म्हणून हा चित्रपट खूप गाजला होता. 

मिस्टर परफेक्ट (2011)

पहिला कॉमेडी चित्रपट डार्लिंगच्या यशानंतर प्रभासने लगेचच दुसरा तसाच चित्रपट साईन केला. या चित्रपटाचे नाव मिस्टर परफेक्ट.  या चित्रपटातही प्रभास आणि काजल अगरवाल यांची जोडी पाहायला मिळाली. भावनिक दृश्य, चांगली कथा यामुळे हा चित्रपट खूप चांगली कामगिरी करुन गेला. या चित्रपटात खूप अॅक्शन नसल्याने हा चित्रपट चाहत्यांसाठी खूप फ्रेश होता. 

मिरची (2013)

नेहमीचीच कथा असली तरी मिरची चित्रपटाने खूप चांगली कामगिरी केली. देवी श्री प्रसाद यांचे संगीत आणि भन्नाट अॅक्शन यामुळे हा चित्रपट प्रचंड गाजला. तसेच अनुष्का शेट्टी आणि प्रभास यांची केमिस्ट्री सर्वांना खूप आवडली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: happy birthday prabhas these are 5 films of prabhas besides bahubali which were hit