
एका मुलाखतीमध्ये रमेश सिप्पी यांनी सांगितले होते की, शोले बनविण्यासाठी माझ्याकडे अजिबात पैसे नव्हते. त्यासाठी मी घरच्यांची मदत घेतली. त्यावेळी तीन कोटी रुपये एवढा खर्च आला होता.
मुंबई - कित्येक वर्षे काम करुनही काही कलाकारांना आपल्या हयातीतील सर्वोत्कृष्ट कलाकृती साधत नाही. त्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले असते. मात्र काही कलाकार असे असतात की ज्यांची एकच कलाकृती वर्षोनुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. शोले हा सिनेमा तयार करणारे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचा आज वाढदिवस त्यानिमित्तानं त्यांच्या व्यक्तिमत्वाचा घेतलेला आढावा.
1. तुम्हाला कदाचित ही गोष्ट माहिती नसेल पण शोले बनविण्यासाठी रमेश सिप्पी यांच्याकडे पैसे नव्हते. त्यासाठी त्यांनी त्यांच्या वडिलांची मदत घेतली होती. ज्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपये कमावले तो तयार करताना पैसे नव्हते.
2. 1975 मध्ये आलेल्या शोले या सिनेमाला तयार करण्यासाठी 3 कोटी रुपये एवढा खर्च झाला होता. आतापर्यत शोलेनं कित्येक कोटी रुपयांची कमाई केली आहे. अजूनगी देशातल्या काही चित्रपटगृहांमध्ये दाखवला जातो.
3. एका मुलाखतीमध्ये रमेश सिप्पी यांनी सांगितले होते की, शोले बनविण्यासाठी माझ्याकडे अजिबात पैसे नव्हते. त्यासाठी मी घरच्यांची मदत घेतली. त्यावेळी तीन कोटी रुपये एवढा खर्च आला होता. त्यावेळी त्या स्टारकास्टवर 20 लाख रुपये खर्च झाले होते. चित्रपटातील सर्वात प्रसिध्द रोल असणा-या गब्बरच्या भूमिकेत डॅनी डेन्जोप्पा यांना विचारणा झाली होती. मात्र त्यांची तारीख न मिळाल्य़ाने ती भूमिका अमजद खान यांना ऑफर करण्यात आली.
4. 15 ऑगस्ट 1975 रोजी शोले हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी तो 100 पेक्षा दिवसांपेक्षा अधिक काळ चित्रपटगृहांमध्ये तळ ठोकून होता. हा चित्रपट तयार करणा-या अशा प्रतिभावान दिग्दर्शकाचा जन्म 23 जानेवारी 1947 रोजी झाला. त्यांचे वडिल जी पी सिप्पी हे हिंदीतील मान्यवर दिग्दर्शक होते.
5. रमेश सिप्पी यांनी त्यांचा पहिला चित्रपट 1951 मध्य़े तयार केला ज्याचे नाव साझा असे होते. तर रमेश हे त्यावेळी फक्त सहा वर्षांचे होते. वयाच्या 9 व्या वर्षी त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले. त्या चित्रपटाचे नाव शहेनशहा असे होते. 1953 साली हा चित्रपट तयार करण्यात आला होता. रमेश यांनी त्या चित्रतपटात बालकलाकाराची भूमिका केली होती. त्यांनी आचला सचदेव यांच्य़ा मुलाची भूमिका केली होती.
6. चित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वी रमेश सिप्पी यांनी लंडनच्या स्कूल ऑफ इकोनॉमिक्स मधून पदवीचे शिक्षण घेतले. मात्र काही कारणास्तव त्यांनी ते पूर्ण केले नाही. सहा महिन्यानंतर ते भारतात आले आणि वडिलांना साहाय्य करु लागले. स्वत दिग्दर्शक म्हणून काम करण्यापूर्वी त्यांनी 1960 आलेल्या बेवकुफ आणि 1969 सालच्या भाई बहन चित्रपटात काम केले होते.
7. वडिलांना मदत करताना त्यांचे सहाय्यक दिग्दर्शक झालेल्या रमेश यांनी त्यांना सात वर्षे सहकार्य केले. दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट हा अंदाज होता. त्यात हेमा मालिनी, राजेश खन्ना, शम्मि कपूर, अरुणा इराणी कलाकार होते.
8. 1972 मध्ये सिप्पी यांनी त्यांची सीता और गीता नावाची दुसरी फिल्म बनवली. त्यात धर्मेंद्र, हेमा मालिनी, संजीव कुमार, कमल कपूर, मनोरमा असे कलाकार होते. या चित्रपटासाठी हेमा मालिनी यांना फिल्मफेय़र अॅवॉर्ड मिळाले होते.
9. 1986 मध्ये त्यांनी भारतीय टेलिव्हीजनवर बुनियाद नावाची एक मालिका तयार केली. जी पुढे कमालीची लोकप्रिय झाली. भारत आणि पाकिस्तान फाळणीवर आधारित ही मालिका तयार करण्यात आली होती.
10. शोले शिवाय रमेश सिप्पी यांच्या आणखी काही फिल्म या हिट झाल्या. त्यात भ्रष्टाचार, अकायल, जमाना दिवाना, यांची नावे सांगता येतील. त्यानंतर त्यांनी 2015 पर्यत कोणताही चित्रपट तयार केला नाही. 2003 मध्ये त्यांनी आपला मुलगा रोहन सिप्पीसाठी कुछ ना कहो हा चित्रपटट दिग्दर्शित केला होता. तो काही फार चालला नाही.