Scarlett Johansson चा नादचं खुळा,तिचं दिसणं,अभिनय खासच !

युगंधर ताजणे
Sunday, 22 November 2020

आपल्याक़डे तयार होणारे अॅक्शन मुव्ही नायिकाप्रधान असल्याने त्यात त्यांना स्थान नसल्याचे पाहवयास मिळते. यासगळ्यात हॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री स्कार्लेट जॉन्सनची गोष्टच वेगळी आहे असे म्हणावे लागेल.

मुंबई - बॉलीवूडच्या अभिनेत्रींना मिळणा-या फॅन फॉलोअर्स हा हॉलीवूडच्या तुलनेत कमी आहे. याचे कारण म्हणजे हॉलीवूडच्या अभिनेत्रींना जगभरात मिळणारा चाहता वर्ग हा आहे. दुसरीकडे भारताशिवाय काही निवडक देशांमध्ये आपल्या अभिनेत्रींचा बोलबाला आहे. अभिनयाच्या बाबतीत त्या पुढे आहेत.

मात्र हॉलीवूडमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या जॉनरचे चित्रपट तयार होतात त्यात काम करणा-या अभिनेत्रींच्या तुलनेत बॉलीवूडमधील अभिनेत्री कमी पडताना दिसतात. अॅक्शन मुव्ही मध्ये काम करणा-या अभिनेत्री बॉलीवूडमध्ये किती आहेत असे म्हटल्यावर लगेचच सांगता येणार नाही.

आपल्याक़डे तयार होणारे अॅक्शन मुव्ही नायिकाप्रधान असल्याने त्यात त्यांना स्थान नसल्याचे पाहवयास मिळते. यासगळ्यात हॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री स्कार्लेट जॉन्सनची गोष्टच वेगळी आहे असे म्हणावे लागेल.

Scarlett Johansson wasn't ready for Avengers Endgame trailer | Metro News

रविवारी मोठ्या उत्साहात स्कार्लेटचा वाढदिवस साजरा करण्यात आला. जगभरात मोठ्या प्रमाणात असलेल्या तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

Oscar award: ऑस्कर पुरस्काराविषयी या आठ गोष्टी माहिती आहेत का? - BBC News  मराठी

ब्लॅक विडो म्हणून प्रसिध्द असलेल्या स्कार्लेटने 36 वर्षात पदार्पण केले आहे. ती कायम चर्चेत असणारी अभिनेत्री आहे.  ल्युसी, ब्लॅक विडो या भूमिका साकारुन जगप्रसिध्द झालेल्या स्कारलेटने मोठी गुप्तता पाळुन लग्न केलं आहे.

Scarlett Johansson - IMDb

 स्कारलेटने  अमेरिकन कॉमेडियन कॉलिन जोस्टशी नवा संसार सुरु केला आहे. स्कारलेटने विवाहबध्द होताना त्याची बातमी कुणाला कळणार नाही याची काळजी घेतली होती. ‘ब्लॅक विडो’ फेम अभिनेत्री स्कारलेट जोहानसनने तिसरं लग्न केलं. 

  काही आठवड्यांपूर्वी तिने खासगी समारंभात लग्न केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Scarlett Johansson Height, Weight, Age, Boyfriend, Facts, Biography

2017 पासून स्कारलेट कॉलिनला डेट करत आहे.  Meals on Wheels च्या अधिकृत इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर स्कारलेटच्या लग्नाविषयीची माहिती देण्यात दिली होती.

 

Avengers – आयर्न मॅन पुन्हा येतोय! | Saamana (सामना)

 2008  मध्ये स्कारलेटने रायन रेनॉल्ड्सशी लग्न केलं होतं. लग्नाच्या तीन वर्षांनंतर 2011 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2014 मध्ये तिने रोमेन डॉरिअॅकशी लग्न केलं. हे लग्नसुद्धा केवळ तीन वर्षे टिकलं.

Scarlett Johansson Boyfriends | List of Scarlett Johansson Dating History

2017 मध्ये स्कारलेटने घटस्फोट दिला. स्कारलेट आणि रोमेनला एक मुलगी असून रोझ असं तिचं नाव आहे. स्कारलेट आता 34 वर्षांची असून कॉलिन 38 वर्षांचा आहे. कॉलिनचं हे पहिलंच लग्न आहे.

Who Has Scarlett Johansson Dated?

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Happy Birthday Scarlett Johansson the actress will be seen in Black Widow soon