happy birthday Sushant  ' तो आला, त्यानं पाहिलं पण जीवनाची लढाई तो हरला' 

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 21 January 2021

दिल बेचारा हा सुशांतचा शेवटचा चित्रपट होता. त्यापूर्वी त्यानं केलेल्या चिछोरे चित्रपटातून सर्वांना प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करण्याची प्रेरणा दिली होती.

मुंबई -  कोणाला असे वाटले नव्हते की तो अभिनेता एवढ्या झटकनं काळाच्या पडद्याआड जाईल. त्यानं आपल्या कामातून प्रेक्षकांना आपलेसे केले होते. अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा अभिनेता सुशांतसिंग नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्येस प्रवृत्त झाला हे सांगणे कठीण आहे. त्यामागील गुढ अद्याप उलगडलेलं नाही. एकीकडे भलेही त्याच्या मृत्युबाबत पोलिसांनी कुठली टिप्पणी केली असेल मात्र चाहत्यांना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत.

21 जानेवारी 1986 रोजी पटना या शहरात सुशांतचा जन्म झाला. फार कमी वेळेत त्याने आपल्या अभिनयानं सर्वांना जिंकून घेतले होते. तो नेमक्या कोणाच्या धाकात होता, त्याच्यावर कुणाचा दबाब होता का, एवढा हसमुख असणारा अभिनेता एवढ्या नैराश्यात कसा गेला या प्रश्नानं सारे बॉलीवूड त्रस्त झाले होते.

दिल बेचारा हा सुशांतचा शेवटचा चित्रपट होता. त्यापूर्वी त्यानं केलेल्या चिछोरे चित्रपटातून सर्वांना प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करण्याची प्रेरणा दिली होती. मात्र आपल्या समोर आलेल्या प्रसंगांना धैर्यानं सामोरं जाताना त्याला अपयश आले हे मान्य करावे लागेल. सुशांतला डायरी लिहिण्याची सवय होती. त्यात तो त्याचे विचार समर्पक शब्दांत लिहित होता. 14 जून 2020 रोजी सुशांतनं त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती.

Dil Bechara, Sushant Singh Rajput's last film, to premiere on Disney+  Hotstar on 24 July - Entertainment News , Firstpost

 गेल्या काही दिवसांपूर्वी सुशांतची बहिण श्वेता सिंह यांनी त्याच्या डायरीतील काही आठवणी सोशल मीडियावर शेयर केल्या आहेत. तसेच सुशांतच्या फॅन्ससाठी पत्र लिहिले आहे. ती म्हणते, माझ्यासाठी हे सगळं पचविणे कमालीचे अवघड आहे. 
जेव्हा जेव्हा मी एखाद्या सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करते त्यावेळी मला ते अवघड वाटते. तेव्हा आणखी नवे एक दुखणे वाढलेले असते. अशावेळी काय करावे ते कळत नाही. परिस्थिती नियंत्रणात आणणे हे काही माझ्या हाती नाही. त्यामुळे सुशांतच्या जाण्याने जी काही जखम झालेली आहे ती वेळीच भरुन येणे अवघड आहे. यासाठी आपल्याला आणखी संयम ठेवण्याची गरज आहे. असे श्वेतानं सांगितले आहे.

त्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, आपल्या बरोबर परमेश्वर आहे तेव्हा आपल्याला घाबरण्याची काही गरज नाही. मात्र न्यायासाठी आवाज उठवावा लागेल. त्यासाठी त्या घटनेचा पाठलाग सोडता कामा नये. शांत व संयम राखून परिस्थितीचा मुकाबला करावा लागेल. आणि ती बदलण्यासाठी वाटही पाहावी लागेल. ब-याचवेळा काय होते की आपण रागाच्या भरात एखादा टोकाचा निर्णय घेतो. मात्र त्याचा तोटा आपल्याला झाल्याशिवाय़ राहत नाही. अशावेळी आपल्यातील उर्जा नष्ट होते हे लक्षातही येत नाही.

Sushant Singh Rajput: 'Dil Bechara' to Premiere on Disney Plus Hotstar -  Variety

तपासयंत्रणांनी जीवपाड मेहनत करुनही ते सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या मुळाशी गेलेले नाहीत. सा-या देशाचे याप्रकरणाकडे लक्ष लागले होते. यासगळ्या पार्श्वभूमीवर सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला लढा सुरू ठेवला आहे. वेळ जात असून अजूनही सुशांतच्या प्रकरणाला यश मिळालेले नाही ही गोष्ट त्याच्या फॅन्सला पटणारी नाही. याची जाणीव श्वेता सिंग यांना आहे. त्यामुळे सोशल माध्यमावर त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली आहे. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: happy birthday Sushant Singh Rajput he quit the world in depression share his memorable post by her sister

Tags
टॉपिकस