आनंदी राधिका 

संकलन : भक्ती परब  
शनिवार, 11 मार्च 2017

एकता कपूरच्या "मेरी आशिकी तुमसे ही' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलेली बबली गर्ल राधिका मदान सध्या खूप आनंदात आहे. आता तुम्ही विचाराल, का बरं आनंदी आहे ती? नव्या मालिकेसाठी तिची निवड झाली की काय? पण अस्सं काहीही झालेलं नाहीय. नुकतेच तिचे इन्स्टाग्रामवरील फॉलोवर्स वन मिलियन झालेत. त्यामुळे ती खुश आहे. छोट्या पडद्यावरचे अनेक कलाकार सोशल मीडियावर ऍक्‍टीव्ह असतात. आपल्या मालिकेतील फोटो, प्रोमोजचे व्हीडिओ, आपल्या सहकलाकाराबरोबरचे फोटो, शूटिंगचे फोटो सतत पोस्ट करून फॅन्सच्या मनात आपल्या सुरू असलेल्या मालिकेविषयी उत्सुकता वाढवत असतात.

एकता कपूरच्या "मेरी आशिकी तुमसे ही' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलेली बबली गर्ल राधिका मदान सध्या खूप आनंदात आहे. आता तुम्ही विचाराल, का बरं आनंदी आहे ती? नव्या मालिकेसाठी तिची निवड झाली की काय? पण अस्सं काहीही झालेलं नाहीय. नुकतेच तिचे इन्स्टाग्रामवरील फॉलोवर्स वन मिलियन झालेत. त्यामुळे ती खुश आहे. छोट्या पडद्यावरचे अनेक कलाकार सोशल मीडियावर ऍक्‍टीव्ह असतात. आपल्या मालिकेतील फोटो, प्रोमोजचे व्हीडिओ, आपल्या सहकलाकाराबरोबरचे फोटो, शूटिंगचे फोटो सतत पोस्ट करून फॅन्सच्या मनात आपल्या सुरू असलेल्या मालिकेविषयी उत्सुकता वाढवत असतात. त्यांचे फॅन्सही त्यांना आपल्या चांगल्या-वाईट प्रतिक्रिया सोशल मीडियातूनच देत असतात. त्यामुळे कलाकारांना आपल्या फॅन्सच्या संपर्कात राहता येतं आणि या कलाकारांचं आपल्या मालिकेचं प्रमोशनही धमाकेदार होतं. मालिकांच्या बातम्या देणाऱ्या अनेक वेब पोर्टल्सची लेटेस्ट गॉसिप मिळवण्यासाठी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नजर असते. पण राधिकाला सोशल मीडिया अपडेट राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचा वाटतो. कारण सर्व स्तरातील गाजलेल्या बातम्या, वेगळ्या आशयाची माहिती सोशल मीडियामुळे मिळते. सोशल मीडियावर उत्स्फूर्तपणे ज्या पोस्ट लिहिल्या जातात, फोटो अपलोड केले जातात, त्यात मनापासून केलेली क्रिएटिव्हीटी असते, असं राधिकाला वाटतं. त्यामुळे सोशल मीडियावर फॉलोवर्सचा वन मिलियनचा आकडा पार होणं तिच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. 
 

Web Title: Happy Radhika