Har Har Mahadev: या दिवशी होणार ‘हर हर महादेव’ची शिवगर्जना, सुबोध भावेची पोस्ट

या चित्रपटात सुबोध भावे छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार असल्याने सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
har har mahadev marathi movie poster out released on 25 october cast sobodh bhave
har har mahadev marathi movie poster out released on 25 october cast sobodh bhave sakal

subodh bhave: सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, स्वराज्यासाठी लढलेले योद्धे, आपला इतिहास यावर अनेक चित्रपट येत आहेत. दिग्पाल लांजेकर, अमोल कोल्हे, प्रवीण तरडे या कलाकारांसह बॉलीवूडमध्येही शिवचरित्रावर चित्रपट निर्मिती होत आहे. अशातच 'झी' स्टुडिओजने देखील एक मोठी घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागवणारा 'हर हर महादेव' हा चित्रपत्र ते लवकरच घेऊन येत आहेत. मध्यंतरी त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकरणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्कंठा सगळ्यांनाच लागली होती. अखेर या ती तारीख जाहीर झाली आहे. (har har mahadev marathi movie poster out released on 25 october cast sobodh bhave )

'हर हर महादेव' या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत सुबोधने लिहिलं आहे की,"अखंड स्वराज्यचं स्वप्न पाहणारा तो राजा रयतेचा, मराठी रक्तासाठी लढणारा तो राजा रयतेचा, मराठी रक्तासाठी लढणारा तो लेक जिजाऊचा, गनिमाच्या चिंध्या करणारा तो चालक भवानी तलवारीचा, एकमेव जो छत्रपती झाला तो भक्त जगदंबेचा".  सुबोधने पुढे लिहिलं आहे की,"आता अभिमानाने मोठ्या पडद्यावर 'हर हर महादेव' ही शिवगर्जना घुमणार. पहिल्यांदाच मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू आणि कन्नड या पाच भाषांत येत्या दिवाळीत 25 ऑक्टोबरपासून संपूर्ण देशात सिनेमागृहात प्रदर्शित होणार". 

छत्रपती शिवरायांचं कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावं या उद्देशाने 'हर हर महादेव' हा भव्य दिव्य सिनेमा मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगु आणि कन्नड भाषेतून प्रदर्शित करण्याचा निर्णय झी स्टुडिओजने घेतलेला आहे. अभिजीत देशपांडेने या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com