सलन दोन वर्षे गर्भपात; हरभजनच्या पत्नीने सांगितला 'तो' कटू अनुभव

गेल्या महिन्यात गीताने मुलाला जन्म दिला.
geeta harbhajan
geeta harbhajan

क्रिकेटर हरभजन सिंगची Harbhajan Singh पत्नी आणि अभिनेत्री गीता बसरा Geeta Basra गेल्या महिन्यात दुसऱ्यांदा आई झाली. हरभजन-गीताला एक मुलगी आहे आणि त्यानंतर आता गीताने मुलाला जन्म दिला. या दोघांनी मुलाचं नाव जोवान असं ठेवलं आहे. जोवानच्या जन्माआधी सलग दोन वर्षांत गीताचा दोन वेळा गर्भपात झाला. २०१९ आणि २०२० मध्ये गीताला गर्भपाताचं दु:ख सहन करावं लागलं होतं. या कठीण काळात पत्नीच्या बाजूने खंबीरपणे राहण्यासाठी हरभजन पंजाबहून लंडनला गेला होता. (Entertainment news in marathi)

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गीता याबद्दल व्यक्त झाली. "गर्भपातानंतर महिलांनी हिंमत आणि अपेक्षा सोडू नये. त्यांनी स्वत:ला सावरलं पाहिजे. गेल्या दोन वर्षांत मी दोन वेळा आघात सहन केला. पण मी हार मानली नाही. गर्भपातानंतर स्त्रियांच्या हार्मोन्समध्ये असुंतलन निर्माण होतो. अशा वेळी संयम बाळगून गोष्टींना स्वीकारणं खूप कठीण असतं. पण मी या काळात स्वत:ला वारंवार समजावत राहिले, डगमगले नाही", असं तिने सांगितलं.

geeta harbhajan
'दोन दिवसात लग्न उरकायचंय'; जान्हवी कपूरचा वेडिंग प्लॅन

"तिसऱ्यांदा गरोदर राहिली तेव्हा मी पूर्णपणे विश्रांती घेतली. योग्य ते औषधोपचार केले आणि तीन महिन्यांनंतर मुंबईला आले. या काळात मला योगसाधनेचाही खूप फायदा झाला. सगळं व्यवस्थित होणार असं मला आतून वाटत होतं आणि तसंच झालं", असं ती पुढे म्हणाली.

गीताने १० जुलै रोजी जोवानला जन्म दिला. हरभजन-गीताला २०१६ साली पहिलं मूल झालं. मुलीचं नाव त्यांनी हिनाया हीर प्लाहा असं ठेवलं. २०१५ मध्ये हरभजन आणि गीताने लग्नगाठ बांधली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com