हरिहरन, साधना यांचे "व्हॅलेंटाईन'ला "हौले हौले' 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

मुंबई :"व्हॅलेंटाईन डे'ची साऱ्यांना उत्सुकता असताना बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक हरिहरन आणि गझल गायिका साधना जेजुरीकर यांनी "हौले हौले...' हे प्रेमगीत नुकतेच मुंबईत लॉंच केले. यावेळी हरिहरन, साधना यांच्यासह ग्रॅमी पुरस्कार विजेते पंडित विश्‍वमोहन भट्ट, गझल गायिका पिनाज मिसानी आणि अभिनेते रमेश भाटकर उपस्थित होते. यावेळी साधना म्हणाल्या, की हे प्रेमगीत आहे. साहिल सुलतानपुरी यांनी लिहिलेल्या या गीताला हरिहरन यांनी उत्तम संगीत दिले आहे. मी या गीताला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे.

मुंबई :"व्हॅलेंटाईन डे'ची साऱ्यांना उत्सुकता असताना बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक हरिहरन आणि गझल गायिका साधना जेजुरीकर यांनी "हौले हौले...' हे प्रेमगीत नुकतेच मुंबईत लॉंच केले. यावेळी हरिहरन, साधना यांच्यासह ग्रॅमी पुरस्कार विजेते पंडित विश्‍वमोहन भट्ट, गझल गायिका पिनाज मिसानी आणि अभिनेते रमेश भाटकर उपस्थित होते. यावेळी साधना म्हणाल्या, की हे प्रेमगीत आहे. साहिल सुलतानपुरी यांनी लिहिलेल्या या गीताला हरिहरन यांनी उत्तम संगीत दिले आहे. मी या गीताला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. हे गीत आधुनिक असून ते युवा पिढी, शास्त्रीय संगीत आणि गझल प्रेमींनाही तितकेच भावेल, असा विश्‍वासही साधना यांनी व्यक्त केला. हे गीत मॉडेल नित्या कुमार आणि नितीश कुमार यांच्यावर चित्रीत झाले आहे. विवेक गुप्ता यांनी व्हिडीओचे दिग्दर्शन केले आहे. 
 

Web Title: hariharan and sadhana valentains day concert