'Harry Potter'ला घडवणाऱया जे. के. रोलिंगचा बर्थडे!

टीम ईसकाळ
बुधवार, 31 जुलै 2019

हॅरी पॉटर या पुस्तकाच्या लेखिका जे. के. रोलिंग यांचा आज वाढदिवस असतो. त्यामुळे त्यांनी या पुस्तकात हॅरीच्या जन्माची तारीखही 31 जुलैच दिली आहे. त्यामुळे ओघाने आज या दोघांचाही वाढदिवस. 

आपल्या बालपणी जादुई दुनियेची सफर घडविणाऱ्या हॅरी पॉटरचा आज वाढदिवस! ज्यांनी आख्खी जादुई दुनिया आपल्या लेखणीतून उतरवली त्या हॅरी पॉटर या पुस्तकाच्या लेखिका जे. के. रोलिंग यांचा आज वाढदिवस असतो. त्यामुळे त्यांनी या पुस्तकात हॅरीच्या जन्माची तारीखही 31 जुलैच दिली आहे. त्यामुळे ओघाने आज या दोघांचाही वाढदिवस. 

जे. के. रोलिंग यांनी हॅरीला सात भागात विभागलं आहे. प्रत्येक भागाचा मोठा चाहता वर्ग आहे. हॉगवर्ट्स या जादुई शाळेची दुनिया, त्यातले अवली जादुगार, हॅरी, हर्मायनी, रॉन, डम्बलडोर, हॅग्रिड, स्नेप, सिरियस ब्लॅक आणि असे अनेक कॅरेक्टर ज्यात सगळे हरवून गेले.   

Image result for harry potter wikipedia

त्यांना हॅरी पॉटर या सिरीजमधील सात पुस्तके प्लॅन करण्यासाठी तब्बल 5 वर्ष लागली. डेथली हॉलोजमधील 34 वा धडा, 'The Forest Again' तिचा सर्व पुस्तकांमधील आवडता आहे.

हॅरी पॉटर पुस्तकाचे भाग
हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन
हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स
हॅरी पॉटर अँड द प्रिझनर ऑफ अझकबान
हॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर
हॅरी पॉटर अँड ऑर्डर ऑफ फिनिक्स
हॅरी पॉटर अँड हाफ ब्लड प्रिंस
हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harry potter series writer J K Rowling birthday