हर्षवर्धन घेतोय टीप्स 

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 मे 2017

अभिनेता अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरने "मिर्झिया' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री तर केली; पण

अभिनेता अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरने "मिर्झिया' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री तर केली; पण त्याचा हा पहिलाच चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरला नाही. तसंच प्रेक्षकांनी अभिनेता म्हणूनही तितकंसं स्वीकारलं नाही; पण त्याच्यावर निर्माते मंडळी खूश आहेत म्हणे. कारण "मिर्झिया' प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याने काही चित्रपट साईन केलेत. यातील एक चित्रपट विक्रमादित्य मोटवानीचा "भावेश जोशी'; ज्याचं चित्रीकरण हर्षवर्धननं पूर्ण केलंय. आता तो पुढील प्रोजेक्‍टसाठी एका प्रसिद्ध निर्मात्या-दिग्दर्शकाकडून टीप्स घेतोय. तुम्हाला प्रश्‍न पडला असेल ना, की हा कोणाकडून टीप्स घेतोय. तर तो आहे निर्माता आणि दिग्दर्शक अनुराग कश्‍यप. अनुराग सध्या त्याचा गुरू बनलाय. सूत्रांच्या माहितीनुसार, विक्रमादित्यने हर्षवर्धनची अनुरागशी भेट घडवली होती. त्यानंतर हे दोघे चांगले मित्र बनले. आता तो अनुरागकडून पटकथा आणि कोणत्या प्रकारचे चित्रपट करू यासारख्या विविध गोष्टींसाठी सल्ले घेतोय. हे दोघं हल्ली सारखे भेटत असल्याचंही समजतंय. त्यामुळे हे दोघं लवकरच एखाद्या प्रोजेक्‍टमध्ये दिसतील, असं बोललं जातंय. 

Web Title: Harshavardhan kapoor giving the tips