मिनिषा लांबाचा हॉट लूक पाहिलाय का?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

बॉलिवुड अभिनेत्री मिनिषा लांबा मागील अनेक दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून लांब आहे. लग्नानंतर तिचा कोणता मोठा चित्रपट प्रदर्शीत झालेला नाही. मिनिषा चित्रपटांपासून दूर असेन परंतु, तिचे ग्लॅमर अद्याप कमी झालेली नाही. 

बॉलिवुड अभिनेत्री मिनिषा लांबा मागील अनेक दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून लांब आहे. लग्नानंतर तिचा कोणता मोठा चित्रपट प्रदर्शीत झालेला नाही. मिनिषा चित्रपटांपासून दूर असेन परंतु, तिचे ग्लॅमर अद्याप कमी झालेली नाही. 

मिनिषाने शुजित सरकारचा चित्रपट "यहां" पासून 2005मध्ये बॉलिवुडमध्ये प्रदार्पण डेब्यु केले होते. या चित्रपटात मिनिषा सोबत जिमी शेरगिर होते. या चित्रपटात दोघांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी खुप कौतुक केले होते.

मिनिषा दिल्लीची राहणारी आहे. तिने दिल्ली विद्यापिठाच्या मिरांडा हाऊस कॉलेज मधू इंग्रजी साहित्याची डिग्री घेतली आहे.

मिनिषा जरी चित्रपटांपासून दूर असली तरी, ती आपल्या फिटनेसची पुरेशी काळजी घेते. त्यासाठी ती नियमीत व्यायाम आणि खाण्यावर नियंत्रण ठेवते.

मिनिषा लांबाने महाविद्यालयीन शिक्षणानंतर मोठमोठ्या प्रसिद्ध ब्रॅंडसाठी मॉडलिंग केली होती. त्यानंतर तीला चित्रपटांमध्ये काम मिळाले होते. 

मिनिषाने कॉर्पोरेट, हनिमून ट्रॅव्हल्स प्रायवेट लिमिटेड, बचना ऐ हसीनो आणि शॉर्य सारख्या सुप्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे.

श्याम बेनेगलचा चित्रपट '''वेल डन अब्बा' मध्ये मिनिषाने बोमन ईरानीच्या मुलीची भूमिका बजावली होती. या भूमिकेसाठी प्रेक्षकांनी आणि फॅन्सने तिचे खुप कौतुक केले होतं. 

मिनिषाने 2015 मध्ये आपला प्रियकर रेयान थाम याच्याशी लग्न केले. रेयान आणि मिनिषाचा अफेअर खुप वर्ष बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय होता.

मिनिषा ने टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉस 8 मध्येही भाग घेतला होता. या शोमध्ये ती सहाव्या आठवड्यातच बिग बॉसच्या घरातून बाहेर गेली होती.

चित्रपटांपासून दूर असूनही मिनिषा सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव असते. इंस्टाग्रामवर तिचे साडेतीन लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

मिनिषा नेहमी बीचवेअर मधील आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेयर करत असते. यावर चाहते लाईक्सचा वर्षाव करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Have you seen the hot look of Minisha Lamba?