
Hema Malini : 'लग्नानंतर लगेच अपत्य नको, त्यामुळेच तर...' हेमा मालिनींचे परखड वक्तव्य
Hema Malini Bollywood Actress share deepika : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांचे एक वक्तव्य सध्या सोशल मीडियावर भलतेच चर्चेत आले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना हेमाजींनी यांनी सध्याच्या बॉलीवूड मधील प्रख्यात अभिनेत्रींशी तुलना करताना हेमाजींनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे त्यांचे चाहते देखील अवाक् झाले आहेत. हेमाजी या नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे चर्चेत असणाऱ्या सेलिब्रेटी आहेत.
काही दिवसांपूर्वी हेमाजी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या मतदार संघातमध्ये केलेल्या कामकाजाबद्दल माहिती देताना त्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. यामध्ये त्यांनी आकडेवारीमध्ये चूक केली होती. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हेमाजींनी १९६८ मध्ये सपनो के सौदागर पासून बॉलीवूडमधील आपल्या करिअऱला सुरुवात केली होती.
Also Read - हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?
अभिनेत्रीनं लग्नानंतर चित्रपटात काम करण्याबाबत हेमाजी यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यामुळे त्या चर्चेत आल्या आहे. पीटीआयशी बोलताना त्या म्हणाल्या, एक काळ होता जेव्हा लग्न झालेल्या अभिनेत्रींचे बॉलीवूडमधील करिअर संपत असे. आता तसे नाही. थोडा बदल झाला आहे. दीपिका पासून आलिया भट्ट पर्यत यांनी लग्नानंतर देखील आपले करिअर जोरदापणे सुरु ठेवले आहे. सध्या इंडस्ट्रीमध्ये जो बदल आहे ते स्वागतार्ह आहे.
माझ्याबाबत जर म्हणाल तर, मी लग्नानंतर चित्रपटात काम करणे काही बंद केले नाही. लग्नानंतर देखील मी सलग काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामुळेच की काय अजुनही मला लोकं फॉलो करतात. आताच्या तरुणांना एक गोष्ट समजायला हवी ती म्हणजे, आपल्या पत्नीला जर तुमच्या सहकार्याची गरज असेल तुम्ही ते करायला हवे. पत्नीलाही कुटूंबासाठी अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो.
पतीनं पत्नीच्या करिअरचा विचार करायला हवा. पत्नीची काही स्वप्न असतील त्याचा विचार करुन तिला शक्य तितकी मदत करायला हवी. लग्न झाल्यानंतर लगेच अपत्य त्यामुळे पत्नीला तिच्या करिअरमध्ये अनेक अडचणी येण्याची शक्यता असते. वाढत्या वयाचा आपल्या आरोग्यावर होणारा परिणामही लक्षात घेण्याची गरज आहे. आता तर चित्रपटातील निर्माते तुम्हाला हवे तितके पैसे द्यायला तयार आहेत फक्त तुमची काम करण्याची इच्छाशक्ती हवी. असेही हेमाजी यांनी सांगितले.