हेमंत बनला अँकर 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 एप्रिल 2017

मराठी चित्रपट अभिनेता आणि लेखक हेमंत ढोमे आता सूत्रसंचालक बनला आहे. "कलर्स मराठी' वाहिनीवर येणाऱ्या "ढोलकीच्या तालावर... छोट्यांची अदाकारी लै भारी' कार्यक्रमाचं अँकरिंग तो करणार आहे.

1 मेपासून कार्यक्रमास सुरुवात होणार असून आपल्या नव्या इनिंगबाबत हेमंत फारच उत्सुक आहे. महाराष्ट्राच्या कला-संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असलेल्या लावणी नृत्यशैलीला "ढोलकीच्या तालावर' कार्यक्रमात वेगळ्या ढंगात सादर करण्यात आले. पहिल्या दोन पर्वांना चांगला प्रतिसाद मिळाला.

आता तिसऱ्या पर्वात संपूर्ण महाराष्ट्रातून असंख्य मुलींनी हजेरी लावली आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद आदी ठिकाणी जाऊन 12 प्रतिभावान आणि नृत्याची जाण असणाऱ्या स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. त्यातील काही निवडक मुलींनाच कला दाखविण्याची संधी मिळणार आहे.

जितेंद्र जोशीबरोबरच फुलवा खामकर आणि ज्येष्ठ नृत्यांगना शकुंतलाताई नगरकर कार्यक्रमाच्या परीक्षक आहेत. छोट्या मुलींची निरागस अदाकारी, त्यांची नृत्याबद्दलची जाण आणि प्रेम पाहून परीक्षक थक्क झाले. कॉमेडीची उत्तम जाण असलेला कलाकर म्हणून हेमंतकडे पाहिले जाते. अँकरिंग करताना त्याचा त्याला कितपत उपयोग होतो ते कळेलच. 
 
Web Title: hemant dhome anchor