Hemant Dhome: हा नाद भलताच! व्हिडिओ शेयर करत हेमंत ढोमेनं सांगितलं बैलगाडा शर्यतीशी असलेलं खास कनेक्शन..

जाणून घ्या 'गाडा शर्यत' आणि हेमंत ढोमे यांचं खास नातं..
hemant dhome shared video post about bail gada sharyat in his native place kathapur pimparkhed
hemant dhome shared video post about bail gada sharyat in his native place kathapur pimparkhedsakal

Hemant Dhome: हेमंत ढोमे सोशल मीडियावर भलताच सक्रिय पहायला मिळतो. तो अनेकदा ज्या पोस्ट करतो त्याची जोरदार चर्चा रंगते. तो अनेक अनुभव तिथे शेयर करत असल्याने अनेकांचे लक्ष त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट वर असते.

हेमंत फक्त अभिनेता म्हणून नाही तर एक उत्तम लेखक,दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही आता नावारुपास आला आहे. नुकताच त्याचा 'सनी' चित्रपट आपल्या भेटीस आला होता. तर लवकरच त्याचा 'झिम्मा 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

त्यामुळे सध्या हेमंतची मनोरंजन विश्वात बरीच हवा आहे. अशातच हेमंतने एक पोस्ट शेयर केली आहे, जी पाहून अनेकांनी नाद करा पण आमचा कुठं असंच म्हंटलं आहे..

(hemant dhome shared video post about bail gada sharyat in his native place pimparkhed)

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

ही पोस्ट आहे बैलगाडा शर्यतीची.. महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत हा एक जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. याला बराच विरोध ही झाला पण अखेर बैलगाडा शर्यत सुरू झाली आणि गावागावात जल्लोष झाला.

अशाच एका गाडा शर्यतीत फेटा वगैरे बांधून हेमंत ढोमेने हजेरी लावली होती. विशेष म्हणजे ही शर्यत होती त्याच्या स्वतःच्या गावाच्या शेजारी, म्हणजे पिंपरखेडच्या शेजारी काठापूरची शर्यत... या जत्रेशी त्याचं खास नातं आहे, कारण एकेकाळी हेमंत च्या घरचा बैलगाडा हा मनाचा मानाला जायचा. हीच आठवण त्याने एका पोस्ट मधून सांगितली आहे.

hemant dhome shared video post about bail gada sharyat in his native place kathapur pimparkhed
Vishakha Subhedar: गरज सरो वैद्य मरो.. हास्यजत्रा फेम विशाखा सुभेदारची 'ती' पोस्ट नेमकी कुणासाठी..

या पोस्टमध्ये तो म्हंटला आहे की, ''अनेक वर्षांनी पुन्हा भिर्रर्र… पुर्वी अनेक यात्रांमधे स्वतःचा बैलगाडा घेऊन स्पर्धेत जायचो… आली आली पंचक्रोशीतली मानाची बारी… पिंपरखेडच्या ढोमे पाटलांची बारी… या शब्दांनी स्वागत व्हायचं… आपला गाडा कायमच फायनल सम्राट असायचा!''

''बऱ्याच वर्षांनी आमच्या शेजारच्या गावात, काठापूर यात्रोत्सवात जाण्याचा योग आला, हा थरार भलताच आहे… हा नाद भलताच आहे!'' असे त्याने म्हंटले आहे. सोबत एक व्हिडिओ देखील शेयर केला आहे. ज्यामध्ये गाडा शर्यतीचे दृश दिसते आहे. ही पोस्ट सध्या बरीच व्हायरल होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com