'लक्ष्मीबॉम्ब', 'भुज' सारख्या ७ बड्या सिनेमांच्या होम डिलीवरीचं काऊंटडाऊन सुरु..

दिपाली राणे-म्हात्रे, प्रतिनिधी
सोमवार, 29 जून 2020

हिंदीतील ७ बडे सिनेमे थेट ऑनलाईन रिलीज करणार असल्याची घोषणा आज सोमवार रोजी एका वर्च्युअल पत्रकार परिषदेत करण्यात आली.

मुंबई- कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊनमध्ये थिएटर लवकर सुरु होण्याची काही चिन्ह दिसत नाहीयेत. त्यामुळे अनेक निर्मात्यांचा कल हा सिनेमे ऑनलाईन रिलीज करण्याकडे आहे. अमिताभ-आयुष्मान स्टारर 'गुलाबो-सिताबो' या सिनेमाने याची सुरुवात झाली आणि मग हळूहळू अनेकांनी सिनेमा ऑनलाईन रिलीज करण्याचा निर्णय घेतला. हिंदीतील ७ बडे सिनेमे थेट ऑनलाईन रिलीज करणार असल्याची घोषणा आज सोमवार रोजी एका वर्च्युअल पत्रकार परिषदेत करण्यात आली.

हे ही वाचा: 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेसह 'या' दोन मालिकांनीही मुंबईत केला शूटिंगचा श्रीगणेशा

आज पार पडलेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत वरुण धवनने यावेळी उपस्थित असलेल्या अक्षय कुमार, अजय देवगण, आलिया भट्ट आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत त्यांच्या सिनेमांबाबत चर्चा केली.

अक्षयने त्याच्या 'लक्ष्मीबॉम्ब' सिनेमाबद्दल सांगताना म्हटलं की, 'साडी हा अतिशय सौम्य पेहराव आहे. जे कोणी साडी नेसून काम करतात त्यांच्याविषयी आधीपासूनंच मनात आदर होता मात्र हा सिनेमा केल्यानंतर तो आणखी द्विगुणित झाला आहे'. साडी नेसून शूटींग करताना ज्या अडचणी आला त्याबद्दल अक्षयने अनेक किस्से या दरम्यान शेअर केले.

Is Akshay Kumar's 'Laxmmi Bomb' heading for a web release amid ...

तर दुसरीकडे अजय देवगणचा 'भूज-द प्राईड ऑफ इंडिया' सिनेमा देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतोय. सिनेमाची कथा भारत आणि पाकिस्तानमधील युद्धादरम्यानची आहे ज्यात भूज शहराला वाचवण्यासाठी काही लोकांनी रातोरात एक एअरस्ट्रीप तयार केली होती. या सिनेमात अजयसोबत संजय दत्त आणि सोनाक्षी सिन्हा देखील आहे.

Bhuj: The Pride of India Movie (2020) | Reviews, Cast & Release ...

अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या आगामी 'सडक २' सिनेमाचं पोस्टर यावेळी रिलीज केलं. वडिल महेश भट्ट यांच्यासोबत काम करण्याचं तिचं स्वप्न या निमित्ताने पूर्ण झाल्याचं तिने म्हटलं आहे.

Sadak 2 poster: Alia Bhatt says Mahesh Bhatt wanted only Mount ...

तर अभिषेक बच्चनचा आगामी 'बिग बुल' सिनेमाही ऑनलाईन रिलीज होणार आहे. हा सिनेमा शेअर बाजारमधील घोटाळ्यांवर आधारित असल्याचं म्हटलं जातंय.

The Big Bull: Abhishek Bachchan reveals release date for his next ...

भारतातील डिस्ने इंडिया प्रमुख उदय शंकर यांनी यावेळी सांगितलं की, हे सात सिनेमे २४ जुलै पासून ऑक्टोबर पर्यंत थेट ओटीटीवर रिलीज होणार आहेत. 'लक्ष्मीबॉम्ब', 'भूज', 'सडक २', 'बिग बुल' या चार सिनेमांसोबतंच सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा 'दिल बेचारा', 'लूटकेस', आणि 'खुदा हाफिज' हे  सिनेमे देखील हॉटस्टारवर ऑनलाईन रिलीज होणार आहेत.

Rajkummar Rao, Kartik Aaryan, Shraddha Kapoor and others promote ...

here are all the big bollywood films releasing straight on disney hotstar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: here are all the big bollywood films releasing straight on disney hotstar