"नच बलिये'चा आठवा सीझन लवकरच 

वृत्तसंस्था
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

सेलिब्रेटींचा डान्स रिऍलिटी शो म्हणजे "नच बलिये'. तो पुन्हा येत आहे. वर्षभरापूर्वी त्याचा सातवा सीझन संपला होता. आता नवीन सेलिब्रेटींना घेऊन हा शो मार्चपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्‍यता आहे. या नव्या सीझनमध्ये सुयश राय-किश्‍वर मर्चंट, भारती सिंग-हर्ष लिंबाचिया या दोन जोड्यांचे दिलखेचक नृत्य पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया या चर्चेत असलेल्या जोडीच्या सहभागाबद्दल अजून पुष्टी मिळालेली नाही. त्यातच आणखी एक हॉट जोडी या शोमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. ही जोडी म्हणजे कोरिओग्राफर सनम जोहर आणि अभिनेत्री अबिगेल पांड्ये यांची.

सेलिब्रेटींचा डान्स रिऍलिटी शो म्हणजे "नच बलिये'. तो पुन्हा येत आहे. वर्षभरापूर्वी त्याचा सातवा सीझन संपला होता. आता नवीन सेलिब्रेटींना घेऊन हा शो मार्चपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्‍यता आहे. या नव्या सीझनमध्ये सुयश राय-किश्‍वर मर्चंट, भारती सिंग-हर्ष लिंबाचिया या दोन जोड्यांचे दिलखेचक नृत्य पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया या चर्चेत असलेल्या जोडीच्या सहभागाबद्दल अजून पुष्टी मिळालेली नाही. त्यातच आणखी एक हॉट जोडी या शोमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. ही जोडी म्हणजे कोरिओग्राफर सनम जोहर आणि अभिनेत्री अबिगेल पांड्ये यांची. या शोची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. 

Web Title: Here is the list of ‘Jodis’ that will be on NACH BALIYE