हिमानी शिवपुरीचे कम बॅक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

चित्रपट, नाटक व मालिका या तिन्ही क्षेत्रांत काम केलेल्या अभिनेत्री हिमानी शिवपुरी बऱ्याच कालावधीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. त्या ऍण्ड टीव्हीवरील "एक विवाह ऐसा भी' मालिकेत सासूच्या भूमिकेत दिसणार आहेत. "एक विवाह ऐसा भी' मालिकेची कथा दोन सासूंसोबत राहाव्या लागणाऱ्या एका मुलीवर आधारित आहे. याबाबत हिमानी यांनी सांगितले की, या मालिकेची संकल्पना काहीशी वेगळी आहे. तसेच ही मालिका आश्‍वासक वाटल्याने मी या कामासाठी हो म्हणाले. या भूमिकेशी मी स्वत:ला जोडू शकते. ही मालिका नेहमीच्या मालिकांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ही मालिका आवडेल, अशी मला आशा आहे. 
 
Web Title: himani shivpuri come back