esakal | वडिलांच्या निधनानंतर हिना खानवर कोरोनाचं संकट
sakal

बोलून बातमी शोधा

hina khan

वडिलांच्या निधनानंतर हिना खानवर कोरोनाचं संकट

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खानला कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित हिनाने याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली. हिना सध्या घरातच क्वारंटाइनमध्ये राहत आहे. नुकतंच तिच्या वडिलांचं निधन झालं. 'माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी हा सर्वांत कठीण आणि आव्हानात्मक काळ आहे. त्यातच माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी घरातच क्वारंटाइनमध्ये राहत असून सर्व नियमांचं पालन करतेय', असं हिनाने लिहिलं.

हिनाच्या या पोस्टवर अनेकांनी तिला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. अभिनेत्री सुरभी चंदा, भारती सिंह, सुयश राय, साहिल आनंद, टिना दत्ता यांनी कमेंट करत तिला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

हेही वाचा : 'इतिहासात आपल्या पिढीची नोंद ही..'; निर्बंधांचं पालन न करणाऱ्यांना सुबोधने फटकारलं

मंगळवारी मुंबईतील राहत्या घरी हिनाच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. हिना काही दिवसांपूर्वी कामानिमित्त काश्मिरला गेली होती. वडिलांच्या निधनाचं वृत्त समजताच ती ताबडतोब मुंबईला परतली. एका मुलाखतीमध्ये हिनानं सांगितलं होतं की, "केवळ माझ्या वडिलांनाचा मी काय करणार आहे, माझे स्वप्न काय आहे याची माहिती होती." कश्मिरी परिवारात मोठ्या झालेल्या हिनानं अभिनय क्षेत्रात काम करणं तिच्या घरातील इतर कुणालाही माहिती नव्हते. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून लोकप्रिय झालेल्या हिनानं वेब सीरिजमध्येही काम केले होते.

loading image