100 कोटींचा 'भाईजान'; सलमानने केला विक्रम

टीम ईसकाळ
शनिवार, 8 जून 2019

सलमानच्या 'भारत' चित्रपटाने आज चौथ्या दिवशी 100 कोटी कमाईचा टप्पा ओलांडला असून, त्याच्या तब्बल 14 चित्रपटांनी 100 कोटींची कमाई केलेली आहे.

मुंबई : बॉलिवूडमधील भाईजान अशी ओळख असलेल्या सलमान खानने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भारत' चित्रपटाच्या माध्यमातून नवा विक्रम केला आहे. सलमानच्या 'भारत' चित्रपटाने आज चौथ्या दिवशी 100 कोटी कमाईचा टप्पा ओलांडला असून, त्याच्या तब्बल 14 चित्रपटांनी 100 कोटींची कमाई केलेली आहे.

bharat

दरवर्षी रमजान ईदचा चाँद सल्लूभाईजानच्या चाहत्यांसाठी एक नवं फिल्मी गिफ्ट घेऊन येतो, यंदाही सलमान अन्‌ कतरिनाची जोडी 'भारत' या चित्रपटाच्या माध्यमातून स्क्रीनवर धडकली. सलमानच्या या चित्रपटाने सुरवातीच्या दोन दिवसांमध्ये जोरदार कमाई केली. पण, नंतर कमाईच्या बाबतीत चित्रपट मागे पडल्याचे दिसत आहे. पण, तरिही 100 कोटींची कमाई आणि सलमान खान हे समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासून पाहायला मिळत आहे.

'भारत' या चित्रपटाचे बजेट शंभर कोटी रुपये एवढे असून, हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ओड टू माय फादर' या कोरियन चित्रपटावर आधारित आहे. या चित्रपटाने आज चौथ्या दिवशी 100 कोटींची कमाई केली आहे. सलमानच्या आतापर्यंत 14 चित्रपटांनी 100 कोटींची कमाई केली आहे. यामध्ये 300 कोटींहून अधिक कमाई करणारे 3, 200 कोटींहून अधिक कमाई करणारे 2 आणि 100 कोटींहून अधिक कमाई करणारे 9 चित्रपट आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hindi Movie Bharat earns 100 Crores on Box Office