Motichoor Chaknachoor Trailer : 'जब मादा-मादी हो तय्यार, तो क्या करेगी सरकार'

टीम ईसकाळ
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

पुष्पेंदरही लग्नासाठी तयार होतो. कितीही मिसमॅच असले तरी ते लग्न करतात... मग पुढे ते दुबईला जातात की नाही, अनीचं स्वप्न पूर्ण होतं का, पुष्पेंदरचं लग्न यशस्वी होतं का या सगळ्यावर बेतलेला हा चित्रपट आहे.

नवाझुद्दीन सिद्दीकीने काहीही केलं तरी तो लगेच चर्चेत येतो... आता तर त्याचा चित्रपट येणार म्हणल्यावर त्याची चर्चा नको व्हायला? काल (ता. 11) नवाझच्या 'मोतीचूर चकनाचूर' या चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च झाले. यातही त्याचा अभिनय भाव खाऊन गेलाय. काल पासून हा ट्रेलर सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात नवाझच्या सोबतीला सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी प्रमुख भूमिकेत दिसेल. 'जब मादा मादी हो तय्यार, तो क्या करेगी सरकार' असं म्हणत नवाझुद्दीन धुमाकूळ घालत आहे.

रोहिणी हट्टंगडी यांना विष्णुदास भावे गौरव पदक

36 वर्षांचा पुष्पेंदर त्यागी (नवाझुद्दीन सिद्दीकी) आणि त्याच्या शेजारी राहणारी, परदेशात जाण्याची स्वप्न बघणारी अनी (अथिया शेट्टी) यांची अफाट आणि आगळी-वेगळी प्रेमकहाणी आपल्याला 'मोतीचूर चकनाचूर'मध्ये बघायला मिळणार आहे. पुष्पेंदरला लग्नासाठी फक्त कोणीतर मुलगी हवीय, पण वय सरून गेल्यामुळे त्याला मुलगी मिळेना आणि अथिया ही सुंदर, चुणचुणीत हुशार तरूणी आहे तिला लग्न करून परदेशात जायचंय. पण तिचंही स्वप्न काही कारणाने पूर्ण होताना दिसत नाही. अशातच तिला कळतं की पुष्पेंदर दुबईला जाणार आहे, तिकडे त्याची नोकरी आहे. त्यामुळे ती कसा का असेना पण पुष्पेंदरला लग्नासाठी पटवायला बघते. पुष्पेंदरही लग्नासाठी तयार होतो. कितीही मिसमॅच असले तरी ते लग्न करतात... मग पुढे ते दुबईला जातात की नाही, अनीचं स्वप्न पूर्ण होतं का, पुष्पेंदरचं लग्न यशस्वी होतं का या सगळ्यावर बेतलेला हा चित्रपट आहे.

'गर्ल्स' चित्रपटाचे पोस्टर वादाच्या भोवऱ्यात; सलील कुलकर्णी नाराज

नवाझुद्दीन अनेक दिवसांनी चित्रपट करत असल्याने सगळेजण चित्रपटाची वाट बघत आहेत. नवाझ आणि अथियासोबतच विभा छिबर, नविन परिहार, विवेक मिश्रा असे उत्तम कलाकार या चित्रपटात दिसतील. या चित्रपटाचं दिग्दर्शन देबामित्र बिसवाल यांनी केलं आहे, तर व्हायाकॉम 10ची निर्मिती आहे. हा चित्रपट 15 नोव्हेंबरला प्रदर्शित होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hindi movie Motichoor Chanknachoor movie trailer launched