Panipat Trailer : 'मैं इस धरती के मिट्टी के एक कण के लिए भी मरने को तय्यार हूँ!'

टीम ईसकाळ
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

गेले अनेक दिवस प्रतिक्षित असलेल्या 'पानिपत : द ग्रेट बिट्रेयल' या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. कालपासूनच या चित्रपटातील महत्त्वाच्या पात्रांचे लूक्स संजय दत्तने शेअर केले होते, त्यामुळे हा लचित्रपट कसा असेल याबाबत सगळ्यांचा उत्सुकता होती. पानिपतात मराठ्यांच्या वाट्याला जरी पराभव आला असला, तरी तो पराभव आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात घर करून गेला आहे. याच युद्धभूमीची गोष्ट सांगणार पानिपत यशस्वी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर साकारत आहेत. 

Panipat : अर्जुन कपूर आणि क्रिती सॅननच्या जबरदस्त लुकचे पहिले पोस्टर रिलिज

सदाशिवराव पेशवे यांच्या भूमिकेत अर्जून कपूर तर पार्वतीबाईंच्या भूमिकेत क्रिती सेनन हुबेहुब बसले आहेत. कालपासून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे, ती म्हणजे संजय दत्तने साकारलेल्या अहमद शाह अब्दालीची. पानिपतची तिसरी लढाई ही मराठे व अहमद शाह अब्दाली यांच्यात झाली होती. 14 जानेवारी 1761 ला हरियानातील पानिपत येथे ही लढाई झाली होती. सदाशिवराव पेशवे यांच्या नेतृत्वात मराठ्यांनी ही लढाई लढली होती. या लढाईत अहमद शाह अब्दालीच्या सैन्याने मराठा सैन्याचा पराभव केला होता. 

तीन मिनिटे चौदा सेकंदाचा हा ट्रेलर पुन्हा आपल्याला पानिपतच्या त्या युद्धभूमीवर घेऊन जातो. मराठ्यांनी सांडलेलं रक्त, बाजीराव पेशव्यांनी पानिपतच्या लढाईसाठी सदाशिवरावांची केलेली निवड, सुख-दुःखात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी राहिलेली त्यांची पत्नी पार्वतीबाई व करारी नजरेने समोर उभा ठाकलेला अहमद शाह अब्दाली! या सगळ्याची सांगड घालत युद्धभूमीवरच्या पराक्रमाची कहाणी सांगणारा हा चित्रपट नक्कीच सर्वांसाठी आकर्षण असेल. 

Panipat : संजूबाबाचा 'अहमद शाह अब्दाली' बघितला का?

'मराठा, भारतभूमी के वो योद्धा जिनके लिए उनका धर्म और कर्म उनकी वीरता है', 'सुख मे आपके पिछे व दुःख में आपके आगे खडी रहूंगी' असे दर्जेदार डायलॉग या ट्रेलरमध्ये दिसतायत. मोहनीश बहल, पद्मिनी कोल्हापूरे, झीनत अमान, सुहासिनी मुळ्ये, गश्मीर महाजनी अशी तगडी स्टारकास्ट या टित्रपटात दिसेल. आशुतोष गोवारीकरांचे कमबॅक आणि नितीन चंद्रकांत देसाई यांचे भव्यदिव्य सेट यांमुळे या ट्रेलरला चार चाँद लागले आहेत. 6 डिसेंबरला पानिपत सर्वत्र प्रदर्शित होईल.       

Image

Image

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hindi movie Panipat trailer released