प्रियांका झळकणार 'दि स्काय इस पिंक'मध्ये! पोस्टर रिलीज

वृत्तसंस्था
Monday, 9 September 2019

बॉलिवूड अभिेनेत्री प्रियांका चोप्रा बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाली आहे. 'दि स्काय इस पिंक' या बहुचर्चित चित्रपटाचा पहिला पोस्टर आज प्रदर्शित झाला आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिेनेत्री प्रियांका चोप्रा बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाली आहे. 'दि स्काय इस पिंक' या बहुचर्चित चित्रपटाचा पहिला पोस्टर आज प्रदर्शित झाला आहे. यामध्ये प्रियांका मुख्य भुमिकेत दिसणार आहे.

देसी गर्ल प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पहिला पोस्टर अपलोड केला. त्याचसोबत चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तारखेची घोषणा केली आहे. या पोस्टरला कॅप्शन देताना तिने लिहिलं आहे की, " या परिवारामध्ये पिढीसोबत वेडेपणा काही मागे पडत नाही. उद्या सकाळी 10 वाजता ट्रेलर घेऊन येत आहोत". या पोस्टर मध्ये अभिनेता फरहान अख्तरच्या पाठीवर प्रियांका दिसत आहे. तर, जायरा वसीम आणि रोहित सराफ पुढे पळताना दिसत आहेत. 

चित्रपटाचं दिग्दर्शन शोनाली बोस यांनी केलय. हा चित्रपट 11 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देसी गर्ल चक्क साडेतीन वर्षांनंतर बॉक्स ऑफिसवर परतली आहे. खरंतर ती सलमान खानच्या 'भारत' या चित्रपटात काम करणार होती. मात्र, शेवच्या क्षणाला तिने हा चित्रपट नाकारला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hindi movie The Sky Is Pink first poster out