'शहजादा'मध्ये कार्तिक आर्यनचा रावडी अंदाज, टिझर पाहून चाहते म्हणाले,'यावेळी तू...'Shehzada Teaser,Kartik Aaryan gets into action mode | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shehzada teaser: Kartik Aaryan gets into action mode,but fan says,'Is baar galat script chun li'

Shehzada Teaser:'शहजादा'मध्ये कार्तिक आर्यनचा रावडी अंदाज, टिझर पाहून चाहते म्हणाले,'यावेळी तू...'

Shehzada Teaser: सध्या अनेक तरुणींना ज्याने वेड लावलंय तो अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन. कार्तिकचा आज वाढदिवस आहे. सोशल मीडियावरून कार्तिकला त्याच्या चाहत्यांनी तसंच मित्र-मैत्रिणी आणि अनेक सेलिब्रिटींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कार्तिक लवकरच 'शहजादा' या सिनेमामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर कार्तिकच्या बर्थडे निमित्ताने 'शहजादा' सिनेमाच्या मेकर्सने त्याला खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कार्तिकच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 'शहजादा' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. Shehzada teaser: Kartik Aaryan gets into action mode,but fan says,'Is baar galat script chun li'

हेही वाचा: Shraddha Murder Case: 'या' टी.व्ही अभिनेत्याकडे श्रद्धानं मागितलेली मदत, शॉकिंग खुलासा करत म्हणाला...

'शहजादा' सिनेमाचा टीझर रिलीज केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच या टीझरला लाखो लाईक्स मिळाले आहेत. तर कार्तिकनेदेखील त्याच्या चाहत्यांसाठी वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट म्हणून त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सिनेमाचा टीझर शेअर केलाय. टीझरमध्ये सुरुवातीलाच कार्तिक एका पांढऱ्याशुभ्र घोड्यावरून एका पांढऱ्याशुभ्र भव्य महालामध्ये एन्ट्री करताना दिसतोय. तर पुढे त्याचा रावडी अंदाज पाहायला मिळतोय. सिनेमामध्ये कार्तिक सोबत क्रिती सेनन झळकणार आहे. काही सेकंदाच्या टीझरवरूनच या सिनेमात एक्शन, ड्रामा आणि कॉमेडीचा मसाला पाहायला मिळेल याचा अंदाज येतोय.

हेही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

' शहजादा' हा सिनेमा अल्लू अर्जुनच्या 'अला वैकुंठपुरमलो' या सिनेमाचा हिंदी रीमेक आहे. या सिनेमातील अल्लू अर्जुनच्या स्टाईल प्रमाणेच 'शहजादा'च्या टीझरमध्ये कार्तिकची स्टाईल पाहायला मिळतेय. त्यामुळेच कार्तिकने अल्लू अर्जुनला कॉपी केलं अशा कमेंटही काही नेटकऱ्यांनी टीझर पाहून केल्या आहेत. अल्लू अर्जुनच्या 'अला वैकुंठपुरमलो' या सिनेमाने मोठी कमाई केली होती. तर या सिनेमाच्या हिंदी डबिंगवरून देखील वाद निर्माण झाला होता.

पुष्पा' सिनेमाच्या यशानंतर अल्लू अर्जुनच्या 'अला वैकुंठपुरमलो' या सिनेमाचही हिंदी डब करण्याचा विचार करण्यात आला होता. मनीष गिरीष शाह यांच्याकडे सिनेमाच्या हिंदी डबिंगचे राइट्स होते. मात्र त्यावेळी या सिनेमाचा हिंदी रिमेक म्हणजेच 'शहजादाजा'ची निर्मिती होत होती. 'शहजादा' या सिनेमाचं नुकसान होऊ नये यासाठी अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांनी मुंबईत येऊन शाहा यांना हिंदी डब रिलीज करण्यास थांबवलं.

हेही वाचा: Prateik Babbar: 'आईविषयी मनात प्रचंड राग...', स्मिता पाटील यांच्याविषयी हे काय म्हणाला प्रतिक बब्बर?

दरम्यान 'शहजादा' हा सिनेमा 10 फेब्रुवारी 2023 ला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.