सलमानच्या 'दबंग 3' वर हिंदू जनजागृती समितीचा आक्षेप, कारण...

वृत्तसंस्था
Thursday, 19 December 2019

Dabangg 3 : सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हाचा 'दबंग 3' उद्या चित्रपटगृहात रिलिज होत आहे. पण चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी 'हिंदू जनजागृती समिती' आणि अन्य संघटनांनी आक्षेप घेतला आहे. 

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान याचा बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हाचा 'दबंग 3' उद्या चित्रपटगृहात रिलिज होत आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. पण चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी 'हिंदू जनजागृती समिती' आणि अन्य संघटनांनी आक्षेप घेतला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Promotions chalu! #Dabangg3 @skfilmsofficial

A post shared by Chulbul Pandey (@beingsalmankhan) on

'दबंग 3' चित्रपटामधील प्रसिद्ध गाणं 'हुड हुड दबंग' गाण्यावर आक्षेप घेत हिंदू जनजागृती समितीने विरोध केला आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी भरपूर चांगला प्रतिसाद दिला आहे. पण, या गाण्यात एका सिनमध्ये बॅकग्राउंडला साधू डान्सरच्या वेशात नाचताना दिसत आहेत. गिटार वाजवताना आणि गाण्याच्या चालीवर केसाच्या जटा उडवताना दिसत आहेत. हिंदू साधूंच अशा आक्षेपार्ह पद्धतीने नाचताना दाखवून त्यांचा घोर अपमान केला असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

हिंदू जनजागृती समिती आणि अन्य संघटनांनी जवळपास 21 दिवस देशभरातून आंदोलन करत चित्रपटातील काही आक्षेपार्ह सिन्स काढून टाकण्याची मागणी सेन्सॉर बोर्ड आणि स्थानिक प्रशासनाकडे केली होती. 

हिंदू जनजागृती समितीने मुंबईतल्या सेन्सॉर बोर्डची भेट घेतली आणि चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी आक्षेपार्य सिन्सना वगळण्याची मागणी केली. हिंदू साधूंचा अशाप्रकारचा अपनान सहन केला जाणार नाही आणि चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आत ही दृश्ये हटवण्यात नाही आली तर आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्याचे संघटक सुनील घनवट यांनी दिला आहे. 

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या 'पानिपत' चित्रपटातील जाट आणि राजपुत समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या 'सूरजमल महाराज' यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह आणि अवमानकारक संवाद दाखविण्यात आले होते. मात्र चित्रपटातून ते काढून टाकण्याचे आदेश राजस्थानचे राज्याचे अतिरिक्त मुख्य गृहसचिव राजीव यांनी दिले होते.त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या मुख्य गृहसचिवांनी 'दबंग 3' चित्रपटाला आदेश द्यावेत अशी मागणी सुनील घनवट यांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hindu Janajagruti Samiti protests against Salman Khans Dabangg 3