'टकीला पिणारा,अंगभर टॅटू गोंदवून घेणारा अमेरिकेचा राष्ट्रपती झाला तर....'

hollywood actor Dwayne Johnson 46 percent americans support presidential bid reacts
hollywood actor Dwayne Johnson 46 percent americans support presidential bid reacts

मुंबई - हॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता ड्वेन जॉन्सन हा नेहमी बातमीत राहणारा अभिनेता आहे. तो त्याच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतो. त्याला आता काहीही करुन अमेरिकेचा राष्ट्रपती व्हायचं आहे. त्यासाठी त्यानं तयारीही सुरु केली आहे. खरं तर यापूर्वीही त्यानं आपल्याला अमेरिकेचा राष्ट्रपती व्हायचं आहे असं सांगितलं आहे. मात्र त्याची ती इच्छा काही फलद्रुप झालेली नाही. पण द रॉक मागे हटायला तयार नाही. त्यानं आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर राष्ट्राध्यक्ष होण्याची इच्छा व्य़क्त केली आहे.

मला अमेरिकेचा राष्ट्रपती होऊन देशाची सेवा करायची आहे असं रॉकचं म्हणणं आहे. तसं जर झालं तर ते माझ्यासाठी मोठी गर्वाची गोष्ट असणार आहे. मला ते आवडेल. जॉन्सन एवढ्यावरच थांबलेला नाही. त्यानं आपण खरचं राष्ट्राध्य़क्ष होऊ का यासाठी एक सर्वेक्षणही घेतलं आहे त्यात त्याला 46 टक्के वोटिंग झालं आहे. 46 टक्के अमेरिकन लोकांची अशी इच्छा आहे की जॉन्सननं अमेरिकेचं राष्ट्राध्य़क्षपद भुषवावं.

जॉन्सन हा डब्ल्यूडब्ल्यूईचा प्रसिध्द रेस्लर म्हणून प्रसिध्द आहे. त्याचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बोलबाला आहे. जनमाणसांत तो रॉक म्हणूनही प्रसिध्द आहे. त्याच नावानं त्याची जगभरात ओळख आहे. आता जॉन्सननं सोशल मीडियावर जी पोस्ट शेअर केली आहे त्यात त्यानं असं म्हटलं आहे की, अमेरिकेच्या 46 टक्के लोकांनी माझ्या बाजूनं कौल दिला आहे. त्यांना मी भविष्यात अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष व्हावं असं वाटतयं. मला मोठ्या प्रमाणात आनंद झाला आहे. मला असे वाटत नाही की माझ्या घरात कोणी मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीत भाग घेईल असे वाटले नाही.

कोणी सहा फुट चार इंच उंचीचा, ज्याच्या अंगावर टॅटू आहे असा कृष्णवर्णी जो टकीला पितो त्याला अमेरिकन लोकांचा वाढता प्रतिसाद पाहून मी सुखावून गेलो आहे. टकीला पिणारा माझ्या सारखा एखादाच असेल की जो त्यांच्या क्लबमध्ये सहभागी झाला असेल. मात्र मला अध्यक्ष होऊन देशाची सेवा करायची आहे. असंही जॉन्सननं यावेळी सांगितले. 2017 मध्ये जॉन्सननं सांगितले होते की यापुढील काळात राष्ट्रपती पदासाठी दावेदारी घोषित करण्याचा विचार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com