Johnny Depp: बायकोच्या विरोधातील खटला जिंकलाच! लगेच नव्या प्रोजेक्टची घोषणा

ज्यांनी कुणी हॉलीवूडचा पायरेट्स ऑफ कॅरेबियन (pirates Of Carrebian movie) पाहिला असेल त्यांना जॅक स्पॅरो कोण आहे हे काही नव्यान सांगण्याची गरज नाही.
Hollywood Actor Johny Depp
Hollywood Actor Johny Depp esakal

Hollywood News: ज्यांनी कुणी हॉलीवूडचा पायरेट्स ऑफ कॅरेबियन (pirates Of Carrebian movie) पाहिला असेल त्यांना जॅक स्पॅरो कोण आहे हे काही नव्यान सांगण्याची गरज नाही. जॅकच्या भूमिकेतील जॉनी डेपचं (Johny Depp) सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणामुळे कौतुक होतंय. एक म्हणजे त्यानं आपल्या पत्नीच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचं धाडस दाखवलं. आपल्याला पत्नी कायम मानसिक त्रास देत (Entertainment News) असे. ती स्वत नशेच्या भरात घरातील वस्तु फेकून मारत असे, अशा प्रकारचे वेगवेगळे आरोप जॉनीनं पत्नी एंबर्ड हर्डवर केले होते. तिनंही त्याच्यावर शाररिक, मानसिक आरोप करत सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरुन आपल्याला सत्य बाजु काय आहे हे लोकांना कळण्यासाठी पत्नीच्या विरोधात खटला जिंकायचाच असा पण जॉनीनं केला. आणि तो यशस्वीही झाला. (Johnny Depp Amber Heard)

जॉनीनं पत्नीच्याविरोधील खटला जिंकला. त्याला तिच्या मानहानीपोटी काही रक्कम तिला द्यावी लागणार आहे. साऱं जग या दाम्पत्याच्या घटस्फोटाचा खटला, त्यातील सुनावणी, त्यातील आरोप - प्रत्यारोप सोशल मीडियावर पाहत होते. त्यात एकुण 110 जणांच्या साक्षी घेण्यात आल्या. यावरुन त्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येईल. जॉनीनं आपल्याला या प्रकरणात खूप त्रास झाल्याचे सांगत त्यामुळे वेगवेगळे प्रोजेक्ट आपल्या हातून गेल्याचे त्यानं सांगितले आहे. जॉनीनं एंबरच्या विरोधातील खटला जिंकल्यानं त्यानं लागलीच एक वेगळा प्रोजेक्ट साईन केला आहे.

Hollywood Actor Johny Depp
Video: तरुणाचा भन्नाट जुगाड, आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडीओ

जेव्हा एंबरनं जॉनीवर आरोप केले तेव्हा त्याच्याकडून कित्येक बिग बॅनर चित्रपट काढून घेण्यात आले आहेत. त्यासंबंधीच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. जॉनी आता प्रसिद्ध गिटारिस्ट जेफ बेकसोबत एक अल्बम शुट करणार आहे. त्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. त्या दोघांनी एक ज्वाइंट प्रोजेक्ट देखील साईन केला आहे. जॉनी हा पुढच्या महिन्यात जेफसोबत एक अल्बम शुट करणार आहे. बायकोच्या विरोधातील खटला जिंकुन जॉनीची अशा प्रकारे नवी इंनिंग सुरु झाली आहे. अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. त्यावर नेटकऱ्यांनी जॉनीला शुभेच्छाही दिल्या आहेत.

Hollywood Actor Johny Depp
'बूढ़ा' कमेंटवरुन 'कपिल शर्मा शो' मध्ये घडलं रामायण? कमल हासनचा Video Viral

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com