
कानफटात मारल्यापासून विल स्मिथ अस्वस्थ, घेतोय मानसिक उपचार
Oscar News: यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात विल स्मिथचं (Will Smith) प्रकरण चांगलंच गाजलं. त्याच्या बायकोची ऑस्कर सोहळ्य़ाच्या निवेदकानं टिंगल केली. त्यामुळे ती न सहन (Oscar Awards 2022) झाल्यानं विलनं थेट त्या निवेदकाच्या कानफटात लगावली. त्याच्यावर जगभरातून टीका झाली. अनेकांनी विलच्या रागावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. विलनं भलेही ऑस्कर समितीची माफी मागितली असेल मात्र त्याला यापुढे ऑस्कर (Hollywood News) सोहळ्याला उपस्थित राहता येणार नाही असे समितीनं जाहिर केले. एवढेच नाही तर ज्या पत्नी जेडा पिंकेटसाठी त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं तिनं त्याच्याशी घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्याही व्हायरल झाल्या आहेत. आता विलवर मानसिक उपचार सुरु असल्याचे बोलले जात आहे. ऑस्करच्या समितीनं विल्सवर दहा वर्षांची बंदी घातली आहे.
मीडिया रिपोर्टसकडून आलेल्या माहितीनुसार विल हा मानसिक उपचार घेतो आहे. तो काही दिवसांपूर्वी भारतातही येऊन गेला होता. त्याची मेंटल हेल्थ थेरपी सुरु असल्याचे सुत्रांनी सांगितलं आहे. मुंबई विमानतळावर जेव्हा विल आला होता तेव्हा त्याच्याभोवती फोटोग्राफर्सचा गराडा पडला होता. तो आध्यात्मिक गुरु सद्गगुरुच्या आश्रममध्ये गेला होता. त्याठिकाणी त्यानं मेडिटेशन केलं होतं. ऑस्कर सोहळ्यानंतर तो पहिल्यांदाच लोकांसमोर आला होता. यापूर्वी देखील विल हा भारत दौऱ्यावर आला होता. त्यानं सद्गगुरुंची भेट घेतली होती. असं म्हटलं जातं जेव्हा सद्गगुरु अमेरिकेला गेले होते तेव्हा विलनं त्यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते. आता तो त्यांचा भक्त झाला आहे. भारतात येऊन विलनं हरिव्दारमधील गंगेच्या आरतीमध्ये सहभागी झाला होता.
हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही
ऑस्कर सोहळ्यातील ते प्रकरण अजुनही शांत झालेलं नाही. त्याचे पडसाद अजुनही वेगवेगळ्या निमित्तानं समोर आले आहेत. विलच्या आयुष्यात सध्या काही आलबेल नाही. त्याला त्याच्या पत्नीकडून घटस्फोटाची धमकी आली आहे. यात अजुन त्याच्या पत्नीकडून अधिकृतरीत्या कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही. ऑस्कर सोहळ्यात निवेदक क्रिस रॉकनं विल स्मिथच्या बायकोची पिंकेट स्मिथच्या टकलेपणाची टिंगल केली होती. आणि ती विलच्या जिव्हारी लागली होती. त्यानं थेट क्रिसच्या कानशीलात लगावली होती. यानंतर ऑस्कर समितीनं त्याच्यावर दहा वर्षांची बंदी घातली आहे.
हेही वाचा: Oscar 2022: विल स्मिथ 10 वर्षांसाठी 'बॅन'; काय म्हणालाय अभिनेता?
Web Title: Hollywood Actor Will Smith Takes Mental Health Treatment Slapping Chris Rock
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..