गोल्डन ग्लोब अँवॉर्ड; डेव्हिड फिंचर यांच्या मँकला 6 नामांकने 

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 4 February 2021

72 व्या गोल्डन ग्लोब अॅवॉर्डससाठीच्या नामांकंनाची घोषणा बुधवारी करण्यात आली होती. त्यात डेव्हिड फिंचर यांच्या मँकला सर्वाधिक नामांकने मिळाली आहेत.

मुंबई -  चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रात जगभरात मानाचा समजला जाणा-या गोल्डन ग्लोबची नामांकन नुकतीच जाहीर झाली आहेत. कोरोनामुळे एकीकडे कान्स चित्रपट महोत्सवाला मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले होते. आता गोल्डन ग्लोबच्या पुरस्कार सोहळा पार पडणार की नाही असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाला आहे. या नामांकनाची प्रेक्षक वाट पाहत होते. जगभरातील अनेक प्रसिध्द कलाकार या पुरस्कारासाठी मेहनत घेत  असतात.

72 व्या गोल्डन ग्लोब अॅवॉर्डससाठीच्या नामांकंनाची घोषणा बुधवारी करण्यात आली होती. त्यात डेव्हिड फिंचर यांच्या मँकला सर्वाधिक नामांकने मिळाली आहेत. या चित्रपटाला मिळालेली नामांकनाची संख्या सहा एवढी आहे. त्यानंतर हारून सॉर्किन यांची 'द ट्रायल ऑफ द शिकागो ', फ्लोरियन जेलर यांची 'द फादर', एमराल्ड फेनेल यांची 'प्रोमिसिंग यंग वूमेन' आणि क्लो झाओ यांची 'नोमैडलैंड' यांच्या चार चित्रपटांना नामांकन मिळाले आहे. याबरोबरच टेलिव्हिजन श्रेणीमध्ये द क्राऊन या मालिकेनं सर्वाधिक नामांकन प्राप्त केली आहेत. याशिवाय द क्रिक, ओजार्क आणि द अंडरगोईंगला चार नामांकने मिळाली आहेत. अन्या टेलर आणि जॉय यांना चित्रपटासाठी तर एम्मा आणि द क्वीनमधील गॅम्बिटच्या भूमिकेसाठी टेलिव्हिजन श्रेणीत नामांकन मिळाले आहे.

गोल्डन ग्लोबच्या नामांकनाची यादी पुढीलप्रमाणे आहे. बेस्ट मुव्ही - ड्रामा, द फादर (The Father), मँक (Mank), नोमॅ़डलँड (Nomadland), प्रोमिसिंग यंग वुमेन (Promising Young Woman), द ट्रायल ऑफ दी शिकागो 7 (The Trial of the Chicago 7), बेस्ट पिक्चर - म्यूजिकल / कॉमेडी - बोरट (Borat Subsequent Moviefilm), हॅमिल्टन, म्यूजिक (Music) - पाम स्प्रिंग्स, (Palm Springs), द प्रोम (The Prom),  सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री - मोशन पिक्चर - ड्रामा - वायोला डेविस, मा राईनी ब्लॅक बॉटम, एंड्रा डे, द यूनाइटेड स्टेट्स vs बिली हॉलिडे, वेनेसा किर्बी, पिस ऑफ वूमेन, फ्रांसिस मेकडोरमेड, नोमेडलेड, कॅरी मुलिगन, प्रोमिसिंग यंग वूमेन,

सर्वोत्कृष्ठ अभिनेता - मोशन पिक्चर - ड्रामा, रिज अहमद, साउंड ऑफ मेटल, चाडविक बोसमेन, मा रेनी की ब्लैक बॉटम, एंथनी हॉपकिंस, द फादर, गॅरी ओल्डमॅन, मँक, ताहर रहीम, द मॉरिटानियन, सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री - मोशन पिक्चर - कॉमेडी, मारिया बाकालोवा, बोरट उपवर्ती,  केट हडसन, म्यूजिक, मिशेल पफीफर, फ्रेंच एग्जिट, रोसमंड पाइक, आई केयर ए लॉट, आन्या टेलर-जॉय, एम्मा,  सर्वश्रेष्ठ अभिनेता - मोशन पिक्चर -कॉमेडी, साचा बॅरन कोहेन,  बोराट सबरटेंट मूवेफिल्म, जेम्स कॉर्डन, द प्रोम, लिन-मॅनुअल मिरांडा, हॅमिल्टन, देव पटेल, द पर्सनल हिस्ट्री ऑफ डेविड कॉपरफील्ड, एंडी सॅमबर्ग, पाम स्प्रिंग्स

हेही वाचा : 'तुम्ही एका ट्विटमुळे डगमगत असाल तर..'; तापसी पन्नूचा सणसणीत टोला

 मागच्या वर्षी प्रख्यात अभिनेता टाँम हँक्सला Cecil B DeMille Award नं सन्मानित करण्यात आले होते. तर ब्रॅड पिटला वन्स अपॉन ए टाइम इन हॉलीवुड साठी बेस्ट मोशन पिक्चर (म्यूजिकल/कॉमेडी) चा अॅवॉर्ड मिळाले होते. 
 
 
 
   

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hollywood golden globes 2021 nominations the complete list