प्रियांकाला हॉलीवूडचीही पसंती 

वृत्तसंस्था
शनिवार, 31 डिसेंबर 2016

प्रियांका चोप्राने "मिस वर्ल्ड'चा किताब पटकावल्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला."ऐतराज',"बर्फी,'"बाजीराव मस्तानी',"मेरी कोम',"फॅशन' अशा चित्रपटांतून तिच्या अभिनयाची चुणूक तिने दाखवली. तिने आता हॉलीवूडमध्येही ओळख निर्माण केली आहे.

हॉलीवूडमध्ये संधीच्या शोधात असताना तिला येथे चांगली अभिनेत्री अशी ओळख करण्याची चिंता होती."क्‍वांटिको' या शोनंतर तिला हॉलीवूडमध्ये प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ड्‌वेन जॉन्सनचा"बेवॉच' हा चित्रपट तिला मिळाला . त्यात ती खलनायिकेची भूमिका करीत आहे. तेथील मॅगझिनच्या कव्हर पेजवरही ती झळकली. टॉक शोमध्येही तिला निमंत्रित करण्यात आले होते. हॉलीवूडविषयी असलेली तिची चिंता आता दूर झाली आहे. सध्या ती नवीन वर्षाचे नियोजन करण्यात गुंतली आहे. 
 
Web Title: Hollywood likes Priyanka