प्रियांकाकडे हाॅलिवूडच्या आॅफर्सचा ओघ

टीम ई सकाळ
रविवार, 4 जून 2017

टीव्ही सिरीअल 'क्वांटिको'मधून हाॅलिवूडमध्ये स्थिरावलेल्या प्रियांका चोप्राकडे आता सातत्याने हाॅलिवूडपटांसाठी विचारणा होते आहे. 'बेवाॅच'मध्ये तर ती आहेच. त्यानंतर तिच्या खात्यात 'अ किड लाइक जॅक' हा सिनेमा होताच. त्याचे शूट सुरु व्हायच्या आत आता तिच्याकडे दुसरा सिनेमा आला असून या नव्या सिनेमाचे नाव आहे 'इजंट इट रोमॅंटिक'. 

मुंबई : टीव्ही सिरीअल 'क्वांटिको'मधून हाॅलिवूडमध्ये स्थिरावलेल्या प्रियांका चोप्राकडे आता सातत्याने हाॅलिवूडपटांसाठी विचारणा होते आहे. 'बेवाॅच'मध्ये तर ती आहेच. त्यानंतर तिच्या खात्यात 'अ किड लाइक जॅक' हा सिनेमा होताच. त्याचे शूट सुरु व्हायच्या आत आता तिच्याकडे दुसरा सिनेमा आला असून या नव्या सिनेमाचे नाव आहे 'इजंट इट रोमॅंटिक'. 

सध्या प्रियांका भारतात आली असून लवकरच अमेरिकेत जाऊन ती 'अ कि़ड..'चे शूट सुरू करणार आहे. त्यानंतर पुढच्या सिनेमाच्या डेटस ती देईल. प्रियांकाच्या पीआर टीमनेही ही बातमी कन्फर्म केली असून असे असेल तर सर्वात जास्त हाॅलिवूडपटात झळकणारी प्रियांकाही पहिली अभिनेत्री ठरेल असा दावाही केला जात आहे. 'इजंट इट..' मध्ये अभिनेता रिबेल विल्सन तिच्यासोबत काम करणार आहे. 

Web Title: Hollywood offers to Priyanka chopra news esakal