बिग बॉस मराठीचं घर थेट प्रेक्षकांच्या भेटीला!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

बिग बॉस मराठीचे घर ओमंग कुमार यांनी डिझाईन केले आहे आणि याच घराचे प्रतिरूप बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्याद्वारे प्रेक्षकसुद्धा बिग बॉस मराठीचे घर बघू शकतील.

अनेक देशांमधून करोडो प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवलेला, संपूर्ण भारतामध्ये हुकुमत गाजवणारा कार्यक्रम म्हणजे “बिग बॉस”... हा कार्यक्रम येत आहे हे कळल्यावर या कार्यक्रमबद्दलच्या बऱ्याच चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरु झाल्या. मग तो बिगचा आवाज असो, बिग बॉसच्या घरातील छोट्या मोठ्या गोष्टी वा किस्से वा बिग बॉस मराठीचे घर असो.

पहिल्यांदाच बिग बॉस सारख्या रिअॅलिटी शोचं मराठमोळं रुप कलर्स मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस आणले आणि ते लोकांच्या पसंतीस उतरत देखील आहे. महेश मांजरेकर यांचे सूत्रसंचालन, कार्यक्रमातील सदस्य,त्यांची भांडण, त्यांची दोस्ती - यारी, नॉमिनेशन प्रक्रिया,कॅप्टनसी, टास्क या सगळ्या गोष्टींनी प्रेक्षकांची मने जिंकायला पहिल्या आठवड्यापासून सुरुवात केली. या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग म्हणजे बिग बॉस मराठीचं घरं.

bigg boss

बिग बॉस मराठीचे घर ओमंग कुमार यांनी डिझाईन केले आहे आणि याच घराचे प्रतिरूप बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्याद्वारे प्रेक्षकसुद्धा बिग बॉस मराठीचे घर बघू शकतील. घराचं मराठमोळ रुप प्रेक्षकांना आणि सदस्यांना खूपच आवडले. सदस्य तर या घराच्या प्रेमातच पडले. आता हेच बिग बॉस मराठीचे घर येत आहे तुमच्या शहरामध्ये थेट तुमच्या भेटीला. कलर्स मराठी बिग बॉस मराठीचे घर बघण्याची एक सुवर्णसंधी या कार्यक्रमाच्या तमाम चाहत्यांना देत आहेत. बिग बॉस मराठीचे हे घर बसच्या रुपात महाराष्ट्राच्या भेटीला उद्यापासून येणार आहे.

ही बस अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली, अकोला,बुलढाणा, जळगाव, वाशीम, औरंगाबादच्या काही शहरांमध्ये फिरणार आहे.

बिग बॉस मराठीचे हे सुंदर घर एका बसमध्ये तयार करण्यात आले आहे. ज्यामध्ये घरातील गार्डन एरिया, लिव्हिंग रूम आणि कन्फेशन रूम हुबेहूब तयार करण्यात आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना नक्कीच बिग बॉस मराठीच्या घराचे प्रतिरूप बघण्याची उत्सुकता असेल. तेंव्हा तुम्ही देखील हे घर बघा, अनुभवा. या बसमध्ये तीन रूम तयार करण्यात आल्या त्यामागे महत्वाची कारणे देखील आहेत. गार्डन एरियामध्ये सदस्य बरेच टास्क करतात, सई, मेघा, रेशम, भूषण घरातील सदस्यांची मैत्री, त्यांचं बाँडींग झालं. कन्फेशन रूम तयार करण्यात आली कारण घरातील सदस्य या ठिकाणी थेट बिग बॉस यांच्याशी संवाद साधतात, त्यांचे मनं मोकळं करतात, त्यांच्या मनातील गोष्टी सांगतात. तसेच “बा” चा टीव्ही तयार करण्यात आला कारण, बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना महेश मांजरेकर तसेच बाहेरच्या जगाशी याच जागेहून आणि “बा”च्या टीव्ही मधून संपर्क साधता येतो.

हे बिग बॉस मराठीच्या घराचे प्रतिरूप बसमध्ये तयार करण्यास 10-15 दिवसांचा कालावधी लागला. हे तयार करताना बरेच अडथळे देखील आले. तरीसुध्दा खास प्रेक्षकांसाठी हे तयार करण्यात आले आहे. 

Web Title: house of bigg boss visits all the cities in maharashtra