Maharashtra Shaheer: शाहीरांच्या पत्नी राधाबाईंना कसा वाटला महाराष्ट्र शाहीर? एका कृतीत सगळं आलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Shaheer, Maharashtra Shaheer news, Maharashtra Shaheer songs, Maharashtra Shaheer review

Maharashtra Shaheer: शाहीरांच्या पत्नी राधाबाईंना कसा वाटला महाराष्ट्र शाहीर? एका कृतीत सगळं आलं

Maharashtra Shaheer News: ज्या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते असा महाराष्ट्र शाहीर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. महाराष्ट्र शाहीर सिनेमाने गेल्या महिनाभर सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातलाय.

गेले अनेक दिवस ज्या सिनेमाची खूप चर्चा आहे असा महाराष्ट्र शाहीर सिनेमा आज २८ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालाय.

महाराष्ट्र शाहीर सिनेमा केदार शिंदे आणि त्याच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्वाचा सिनेमा आहे. महाराष्ट्र शाहीर सिनेमा पाहून केदार शिंदेंच्या आजीने मात्र एक भावुक प्रतिक्रिया दिलीय.

(How did Shaheer's wife Radhabai feel about Maharashtra Shaheer movie? kedar shinde reveal)

महाराष्ट्र शाहीर सिनेमा पाहून प्रेक्षक भारावले आहेत. प्रेक्षक सिनेमाला भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

अशातच शाहिरांची दुसरी पत्नी राधाबाईंना हा सिनेमा कसा वाटला याचं उत्तर मिळालंय. केदार शिंदेंनी आजी राधाबाईंचा एक फोटो शेयर केलाय.

या फोटोत राधाबाईंनी केदारला मिठी मारलेली दिसतेय. महाराष्ट्र शाहीर राधाबाईंना कसा वाटलं याचं उत्तर या एका कृतीमधून आलेलं दिसतंय. आजीने नातवाला मारलेली ही मिठी खूप बोलकी आणि अर्थपूर्ण आहे.

केदार शिंदे हा फोटो शेयर करून म्हणतात.. "आणि ही प्रतिक्रिया होती.. मालती कदम अर्थात श्रीमती राधाबाई साबळे यांची. महाराष्ट्र शाहीर पाहिला असेल तर लागलीच लक्षात येईल. पाहिला नसेल तर आजच तिकीट काढून पाहा.

तरच या लाख मोलाच्या जादू की झप्पी चे महत्व समजेल." अशी पोस्ट करुन केदार शिंदेंनी सर्वांना महाराष्ट्र शाहीर सिनेमा पाहण्याचं आवाहन केलंय.

महाराष्ट्राच्या मातीतील थोर लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित महाराष्ट्र शाहीर सिनेमा नुकताच संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

महाराष्ट्र शाहीर सिनेमाचा टिझर, ट्रेलर आणि गाणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली.

महाराष्ट्र शाहीर सिनेमात आई कुठे काय करते फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे राधाबाईंची भूमिका साकारत आहे.

तर अंकुश चौधरी शाहीर साबळेंची भूमिका साकारत आहे.  महाराष्ट्र शाहीर सिनेमा २८ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.