'हाऊज द जोश' दिसला मेनूकार्डवर! काय म्हणाला विकी कौशल?

वृत्तसंस्था
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

आता हाच डायलॉग आणखी एका हटके रूपात समोर आलाय. कसा? वाचा...

विकी कौशलचा 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' मधला 'हाऊज द जोश' हा डायलॉग चांगलाच गाजला होता. यानंतर हा डायलॉग अनेकांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही झळकत होता. या डायलॉगचा फिव्हर इतका पसरला होता की, अनेक जाणांनी स्वतःच्या आवाजात हा डायलॉग रेकॉर्ड करून शेअर केला होता. आता हाच डायलॉग आणखी एका हटके रूपात समोर आलाय. कसा? वाचा...

माधुरी दीक्षितचा हा फोटो होतोय व्हायरल

विकीने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. या स्टोरीत एका मेनूकार्डचा फोटो होता आणि यात मेनू मध्ये चक्क 'हाऊज द जोश' अशा नावाचा मेनू होता! ही डिश रोगन जोश, काश्मिरी मटन, मसाले, केसर आणि जिरा नान यांचे कॉम्बिनेशन होते. हा पदार्थ पाहून विकीही भारावून गेला व त्याने हा फोटो इन्स्टाग्रावर शेअर केला. 

Vicky Kaushal

वाईनचा ग्लास हातात घेतलेल्या मंदिराला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

भारताने पाकिस्तानावर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित हा चित्रपट होता. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच विकीचा हा 'हाऊज द जोश' हा डायलॉग प्रचंड लोकप्रिया झाला होता आणि व्हायरल झाला होता. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनीही या डायलॉगचा वापर आपल्या सभांमध्ये केला होता. आता त्या नावाची डिशही आली असून आता हा 'हाऊज द जोश' किती गाजलाय याचा अंदाज येऊ शकतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: howz the josh dish menu card photo shared by Vicky Kaushal