मेलबर्नकरांचा 'ह्रदयांतर'ला आग्रही प्रतिसाद

टीम ई सकाळ
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटाची निवड यंदा मेलबर्नमध्ये १० ऑगस्टपासून सुरू झालेल्या इंडियन फिल्म फेस्टिव्हल (IFFM)साठी झाली आहे. मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये हृदयांतरचा ह्या आठवड्याअखेरीला वल्ड प्रीमिअर होणार आहे.

मुंबई : विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटाची निवड यंदा मेलबर्नमध्ये १० ऑगस्टपासून सुरू झालेल्या इंडियन फिल्म फेस्टिव्हल (IFFM)साठी झाली आहे. मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये हृदयांतरचा ह्या आठवड्याअखेरीला वल्ड प्रीमिअर होणार आहे.
 
7 जुलैला महाराष्ट्रभरात प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. चित्रपटाला मिळत असलेल्या हाऊसफूल प्रतिसादामूळेच वितरकांनी हृदयांतरचे पाचव्या आठवड्यातही महाराष्ट्रभरात शो ठेवले आहेत. पाच आठवडे चित्रपटगृहांमध्ये गर्दी खेचण्य़ात सध्या फारच कमी मराठी सिनेमांना यश मिळतंय. त्यामूळे सध्या ‘हृदयांतर’ चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट सुखावली असतानाच, आता हृदयांतरसाठी मेलबर्न मधून अजून एक आनंदाची बातमी आली आहे.
 
फेस्टिव्हलची सुरूवात होण्याअगोदरच मेलबर्नमध्ये ह्या आठवड्याअखेरीस ठेवण्यात आलेल्या हृदयांतरच्या प्रीमीयरला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला की, आता प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आयोजकांनी फेस्टिव्हलमध्ये व्हेंटिलेटरचा अजून एक शो वाढवला आहे.
 
सूत्रांच्या अनुसार, कोणत्याही फेस्टिव्हलचे नियोजीत शो असतात. आणि मेलबर्नसारखी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल्स तर नियोजीत वेळापत्रकांनूसारच आपल्या कार्यक्रमांची आखणी करतात. अशावेळी त्यांनी लोकाग्रहास्तव अजून एक शो वाढवणं ही एक खूप गोष्ट म्हणावी लागेल. आणि हे ह्या चित्रपटाचं यश आहे, की, आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्रपटाला त्याच्या पहिल्याच खेळाला हा प्रतिसाद मिळतोय.
 
टोएब एन्टरटेन्मेटच्या सहयोगाने बनलेला, यंगबेरी एन्टरटेन्मेट, इम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शन निर्मित ‘हृदयांतर’ एक कौटूंबिक चित्रपट  आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे, सोनाली खरे, तृष्णिका शिंदे, निष्ठा वैद्य,अमित खेडेकर आणि मीना नाईक  मुख्य भूमिकेत आहेत.

Web Title: hridayantar movie in many festvals esakal news