ह्रतिकच्या हस्ते मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाॅंच

टीम ई सकाळ
शुक्रवार, 26 मे 2017

:हृदयांतर’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारा सुपरस्टार हृतिक रोशन ह्या सिनेमाचा ट्रेलर लाँच करणार आहे.

मुंबई :हृदयांतर’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारा सुपरस्टार हृतिक रोशन ह्या सिनेमाचा ट्रेलर लाँच करणार आहे. 28 मेला मुंबई येषे हा सोहळा होणार आहे. 
 
हदयांतर सिनेमाव्दारे फॅशन डिझाइनर विक्रम फडणीस मराठी सिनेसृष्टीत निर्माता-दिग्दर्शक म्हणून पाऊल ठेवतोय. त्यामुळे आपल्या मित्राच्या सिनेमात काम करताना हृतिक रोशन खूप खुश आहे. त्याने या सिनेमाच्या रिलीजची तारीखही ट्विटरव्दारे जाहिर केली होती. आणि आता 28 मे रोजी होणा-या ह्या सिनेमाच्या ट्रेलर लाँचला हृतिक रोशन हजेरी लावणार आहे.
 
विक्रम फडणीस म्हणतो, “हृतिक रोशन ह्या सिनेमाचा हिस्सा आहे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि हृतिकने नेहमीच या ना त्या प्रकारे हृदयांतरला सपोर्ट केलाय. त्यामुळेच हृतिकच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर लाँच होणं ही हृदयांतरच्या टीमसाठी खुप महत्वाची गोष्ट आहे.”
 
‘हृदयांतर’ चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे आणि सोनाली खरे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Web Title: Hridayantar Trailer launch Hritik Roshan Entertainment eSakal