Saba Azad: हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा लग्नापुर्वीच प्रेग्नंट? 'त्या' पोस्टनं चर्चांना उधाण

Saba Azad Latest Instagram Post
Saba Azad Latest Instagram Postesakal

Hrithik Roshan Bollywood actor Saba Azad girlfriend Post: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाबरोबरच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील लाईमलाईटमध्ये राहतो.

Saba Azad Latest Instagram Post
Parineeti-Raghav Wedding: 'एकमेकांशिवाय जगू शकत नाही..' परिने शेअर केले लग्नाचे काही खास क्षण! फोटो व्हायरल

हृतिक रोशन गायिका आणि अभिनेत्री सबा आझादला डेट करत आहे. दोघेही बऱ्याचदा एकत्र स्पॉट होतात आणि त्यांचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. मात्र आता सबा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

सबाने सोशल मीडियावर अशी काही एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. इतकच नाही तर सबा प्रेग्नंट आहे की अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

Saba Azad Latest Instagram Post
Salman Khan Video: भाईजानचा थाटच न्यारा! गळ्यात भगवं उपरणं टाकून पोहचला CM शिंदेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला

त्याचं झालं असं की, सबाने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर तुमचा स्त्रीरोगतज्ञ कोण आहे ( WhosYourGynac?) असे लिहिले आहे. हा फोटो शेअर करताना सबाने लिहिले - 'सध्या फक्त हाच प्रश्न माझ्या मनात फिरत आहे.'

सध्या सोशल मीडियावर सबाच्या या पोस्टची तुफान चर्चा सुरु झाली आहे. नेटकऱ्यांनी तिला या प्रश्नावर आणखी विविध प्रकारचे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. विषेश म्हणजे सबानं देखील सर्वांच्या प्रश्नाची उत्तरे दिलीत.

तर अनेकांनी सबा प्रेग्नंट आहे का? असा प्रश्न विचारला आहे. मात्र सबानं या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. सबा आणि हृतिक एकमेंकाना बऱ्याच दिवसांपासूव डेट करत आहे. सबा हृतिकच्या घरी देखी बऱ्याच कार्यक्रमात एकत्र दिसली आहे.

Saba Azad Latest Instagram Post
Ganesh Chaturthi 2023: गणपती दर्शनासाठी सीएम शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी! व्हिडिओ व्हायरल

हृतिक रोशन आणि सबा आझाद गेल्या वर्षी एका डिनर डेटवर एकत्र दिसले होते, तेव्हापासून त्यांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या. करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत दोघेही एकत्र स्पॉट झाले होते.

Saba Azad Latest Instagram Post
Parineeti Raghav Wedding: तो क्षण आला! परिणीती - राघव अखेर लग्नबंधनात, डोळ्यांचं पारणं फेडणारा भव्य लग्नसोहळा

यानंतर दोघेही अनेकदा एकत्र दिसले. हृतिक रोशनने 2014 मध्ये सुझान खानशी घटस्फोट घेतला. दोघांना रिहान आणि रिधान अशी दोन मुले आहेत. हृतिक रोशन सध्या दीपिका पदुकोणसोबत सिद्धार्थ आनंदच्या एरियल अॅक्शन चित्रपट 'फायटर'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर वॉर 2 मध्येही तो दिसणार आहे.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com