'मला बॉलीवूडमध्ये नेहमीच...' इतक्या वर्षानंतर ऋतिक बिनधास्त बोलला! | Hrithik Roshan on bollywood | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hrithik Roshan  on bolllywood

Hrithik Roshan : 'मला बॉलीवूडमध्ये नेहमीच...' इतक्या वर्षानंतर ऋतिक बिनधास्त बोलला!

Hrithik Roshan says stardom is a burden : बॉलीवूडचा सुपरस्टार म्हणून नेहमीच ऋतिक रोशनकडे पाहिले गेले. कहो ना प्यार है पासून त्याची लोकप्रियता जी वाढली त्याचा आलेख हा नेहमीच वाढत गेला. दरम्यानच्या तीन ते चार वर्षात ऋतिक हा एका हिट चित्रपटाच्या शोधात आहे. त्यामुळे तो काही काळ नैराश्यात होता. एका मुलाखतीतून त्यानं काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत.

क्रिश, कोई मिल गया, क्रिश २, धुम मध्ये ऋतिकनं कमाल केली होती. त्याला तर ग्रीक गॉड असेही म्हटले जाते. बॉलीवूडमध्ये एक हॉलीवूडचा स्टार राहतो. अशा शब्दांत त्याचे कौतूक होताना दिसते. ऋतिक हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत राहिला आहे. आता त्यानं एक वेगळा खुलासा केला आहे.

Also Read - जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Ved Review : रितेश-जेनेलियाचा प्रेमात पाडणारा 'वेड'! अभिनय, गाणी सगळंच 'लई भारी'

ऋतिकनं दीड वर्षांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे. मात्र हे करताना त्याला वेगवेगळ्या संघर्षाचा सामना करावा लागला. ऋतिक म्हणतो जेव्हा कहो ना प्यार है पासून माझ्यावर स्टारडमचा शिक्का जो बसला तेव्हापासून मी स्टारडमचे ओझे वाहतो आहे. दरम्यानच्या काळात पूलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मात्र लोकं याचा विचार करत नाही.

हेही वाचा: Sonali Bendre : 'माझी हो नाहीतर पाकिस्तानात घेऊन जाईल!' तिच्या सौंदर्याचा 'तो' होता दिवाना

ऋतिकचा एखादा चित्रपट फ्लॉप होतो तेव्हा त्याला त्याचे स्टारडम टिकवण्यासाठी काय मेहनत घ्यावी लागते हे लोकं विचारात घेत नाही. एखाद्याला त्याचे स्टारडम कायम ठेवण्यासाठी खूप धडपडावे लागते. मलाही तसेच झाले. चित्रपटाची कथा, त्याचा विषय, त्यातील भूमिकेसाठी घ्यावे लागणारे कष्ट यामध्ये अनेक अडचणी आल्या. असंही ऋतिकनं यावेळी सांगितले.