हृतिक - सुझानचे होणार 'पॅच अप' ?

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 27 October 2020

अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान हिने तिच्या ४९व्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे.

मुंबई - लॉकडाऊनमध्ये अनेकांचे संसार जसे वेगळे झाले तसे कित्येकांचे सुरळीत सुरु झाल्याचे दिसून आले आहे. यात मोठमोठ्या सेलिब्रेटींचाही समावेश आहे. सध्या बॉलीवू़डचा सुपरस्टार हृतिक रोशन आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान यांच्यातील इंस्टा चॅटिंगची भलतीच चर्चा आहे. यामुळे ते दोघेही पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्या पोस्टमुळे ते पुन्हा एकत्र येणार का हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

सुझानच्या एका फोटोवर हृतिकने कमेंट केली आहे. त्याची कमेंट वाचून हे दोघं पुन्हा एकत्र येणार का, याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान हिने तिच्या ४९व्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील या फोटोमध्ये सुझानचा लुक एकदस खास आहे. ‘मला सर्वोत्तम संधी, सर्वोत्तम मार्गदर्शन दिल्याबद्दल आणि सर्वोत्तम व्यक्ती माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल आयुष्य तुझे खूप खूप आभार’, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. तिच्या या फोटोवर कमेंट करत हृतिकने लिहिलं, ‘लव्ह इट’. त्यासोबत १०० ही इमोजी त्याने पोस्ट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हृतिकच्या अशाप्रकारच्या कमेंटमागील खरे कारण काय हे जाणून घेण्याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली आहे. 
 यापूर्वीही हृतिक आणि सुझान एकमेकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलले आहेत. लॉकडाउनदरम्यान सुझान हृतिकच्या घरी राहायला आली होती. आपल्या दोन्ही मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सुझानने सांगितलं आणि तिच्या या निर्णयाचं हृतिकने मनापासून स्वागतही केलं होतं.  बॉलीवूडच्या या लोकप्रिय जोडीने 2014 मध्ये घटस्फोट घेतला. मात्र घटस्फोटानंतरही या दोघांमधील मैत्री कायम चर्चेचा विषय झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hrithik Roshan commented Ex Wife Sussanne Khan photos