सुजैन खानने फोटो शेअर करत म्हटलं, 'जर तु सोडून गेलास..', हृतिक रोशनने केली अशी कमेंट

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 16 September 2020

अभिनेता हृतिक रोशनन आणि पत्नी सुजैन खान एकमेकांपासून वेगळे झाले असले तरी दोघांमधील मैत्री कायम असल्याचं अनेकदा दिसून येतं. लॉकडाऊनमध्ये दोघेही एकत्र रेहान आणि रिदानची देखभाल करत आहेत.

मुंबई- अभिनेता हृतिक रोशनन आणि पत्नी सुजैन खान एकमेकांपासून वेगळे झाले असले तरी दोघांमधील मैत्री कायम असल्याचं अनेकदा दिसून येतं. लॉकडाऊनमध्ये दोघेही एकत्र रेहान आणि रिदानची देखभाल करत आहेत. दोघे एकमेकांना पाठिंबा देत अनेकदा सोशल मिडियावर पोस्ट करत असतात. यावेळी सुजैनच्या एका फोटोवर हृतिकने कमेंट करत दोघांमधल्या घट्ट मैत्रीची पुन्हा एकदा झलक दाखवली.

हे ही वाचा: अभिनेत्री जया बच्चन यांच्या सुरक्षेत महाराष्ट्र सरकारने केली वाढ

सुजैन खानने इंस्टाग्रामवर तिचा एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. या सोबत तिने एक मस्त कॅप्शन देखील दिलंय. तिने If you leave me गाण्याचे बोल लिहिले आहेत. सुजैनने लिहिलंय, 'जर तु निघून गेलास, मी रडणार नाही, एक दिवस देखील वाया घालवणार नाही.' हृतिक रोशनचं लक्ष लगेचच सुझैनच्या या फोटोकडे गेलं. त्याने सुजैनच्या फोटोची स्तुती केली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

If you leave I won’t cry... I won’t waste a single day.. #neverlookback #eaglesnestwarmth

A post shared by Sussanne Khan (@suzkr) on

हृतिकने सुजैनच्या या फोटोवर कमेंट करत म्हटलं की 'जबरदस्त फोटो.' यावर रिप्लाय करत सुझैन म्हणाली की ती 'लुक अवे' लुक दाखवण्याचा प्रयत्न करत होती. सुजैनच्या या फोटोसोबतंच दोघांच्या या प्रतिक्रियांची देखील चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा होतेय.

sussanne

लॉकडाऊन दरम्यान सुजैन हृतिक रोशनसोबत त्याच्या घरी होती. हा निर्णय त्यांनी त्यांच्या मुलांसाठी घेतला होता. सुझैनच्या या निर्णयाचं कौतुकचे हृतिकचे वडिल राकेश रोशन यांनी देखील केलं होतं. हृतिकपासून वेगळं झाल्यानंतरही सुझैन हृतिकच्या कुटुंबाचा एक अतुट भाग आहे. ती नेहमी गरजेच्यावेळी कुटुंबासोबत असते.   

hrithik roshan comments on sussanne khan photo with if you leave me  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hrithik roshan comments on sussanne khan photo with if you leave me