हृतिक रोशनच्या 'क्रिश 4' मध्ये होणार एका अनोख्या पात्राची एन्ट्री?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

या चित्रपटांचे दिग्दर्शक राकेश रोशन 'क्रिश 4' चित्रपटात जादू हे पात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्याचा विचार करत आहेत. खरे तर त्यावेळी कोई मिल गयामधील जादू या पात्राने सगळ्यांना भुरळ घातली होती.

मुंबई ः अभिनेता ह्रतिक रोशनने आपल्या एकूणच चित्रपट कारकिर्दीत विविध भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे ऍक्शन आणि डान्समध्ये तो कमालीचा तरबेज आहे. लहान मुले त्याची खूप फॅन्स आहेत. कहो ना प्यार हैपासून त्याची चित्रपट कारकीर्द  सुरू झाली असली तरी त्याच्या अभिनय कारकिर्दीतील गाजलेली फ्रेंचाईसी म्हणजे क्रिश. या फ्रेंचाईझच्या तीन चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे ह्रतिक आता 'क्रिश 4' चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. 

हे ही वाचा - आयुषमानच्या तब्बल सहा चित्रपटांचा साऊथमध्ये रिमेक, मानले दिग्दर्शक-निर्मात्यांचे आभार

अशातच आता या चित्रपटात अशा पात्राची एन्ट्री होण्याची चर्चा आहे ज्यामुळे या चित्रपटाच्या सीरिजची सुरुवात झाली. ते म्हणजे 2003 साली प्रदर्शित झालेल्या 'कोई... मिल गया' चित्रपटातील जादू हे पात्र. हा एक एलियन असतो. जो 'कोई... मिल गया' चित्रपटात ह्रतिकला काही सुपर पॉवर देऊन जातो. या चित्रपटांचे दिग्दर्शक राकेश रोशन 'क्रिश 4' चित्रपटात जादू हे पात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्याचा विचार करत आहेत. खरे तर त्यावेळी कोई मिल गयामधील जादू या पात्राने सगळ्यांना भुरळ घातली होती. लहान मुलांचे ते आवडते पात्र ठरले होते.

Hrithik Roshan gave hint to Alien Jadoo in Krrish 4 film Krish 4 ...

या चित्रपटाला सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे जादू पात्र पुन्हा क्रिश ४ मध्ये आणायचा त्यांनी निर्णय घेतला आहे. कारण या जादूची जादू काही अफलातून आहे. विशेष म्हणजे तब्बल 16 वर्षांनंतर जादू हे पात्र चित्रपटात पुन्हा पाहायला मिळणार आहे.सोशल मीडियाद्वारेही हृतिकला त्याचे चाहते क्रिश 4 चित्रपटाबाबत बरेच प्रश्न विचारत आहेत. क्रिश 4मध्ये जादू दिसणार का? असा प्रश्न हृतिकला नेटकरी विचारताना दिसत आहेत.

Hrithik Roshan Confirms His Reunion With Alien Jadoo In Krrish 4

या प्रश्नावर हृतिकनेही सकारात्मक उत्तर दिलं आहे. एलियनला पुन्हा एकदा बोलावण्याची हिच ती योग्य वेळ आहे. असे हृतिकने म्हटले आहे. हृतिकच्या या उत्तरामुळे क्रिश 4मध्ये जादू दिसणार हे सध्या तरी नक्की झालेलं आहे. शिवाय गेल्या बऱ्याच महिन्यांपासून या चित्रपटाच्या कथेवर काम सुरु आहे. बॉलिवूडमधील बहुचर्चित चित्रपटांच्या सीरिजमध्ये क्रिश ही आहे. त्यामुळे चित्रपटाच्या या नवीन भागात कथानक काय वळण घेणार याबाबत ही सिनेरसिक उत्सुक आहेत. 

hrithik roshan confirms alien jaadu will return in krrish 4


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hrithik roshan confirms alien jaadu will return in krrish 4

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: