हृतिकच्या पुनरागमनाची तारिख ठरली; 'सुपर 30' येणार

वृत्तसंस्था
रविवार, 13 जानेवारी 2019

अभिनेता हृतिक रोशनच्या पडद्यावरील पुनरागमनाची नवी तारीख आता जाहीर झाली आहे. 'सुपर ३०' हा चित्रपट आता २६ जुलै रोजी झळकणार आहे. 

मुंबई : अभिनेता हृतिक रोशनच्या पडद्यावरील पुनरागमनाची नवी तारीख आता जाहीर झाली आहे. 'सुपर ३०' हा चित्रपट आता २६ जुलै रोजी झळकणार आहे. 

गणितज्ज्ञ आणि शिक्षक आनंद कुमार आणि त्यांच्या प्रशिक्षण संस्थेवर आधारित 'सुपर ३०' गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या भोवर्‍यात सापडला होता. या चित्रपटात हृतिक रोशन प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल करत आहेत. 'क्वीन' चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या बहल यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. त्यानंतर 'सुपर ३०'च्या प्रदर्शनाच्या तयारीवर विपरित परिणाम झाला होता.

पूर्वनियोजनानुसार, हृतिकचा 'सुपर ३०' येत्या २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. याच दिवशी कंगना राणावतचा 'मणिकर्णिका'ही झळकणार आहे. आता 'सुपर ३०'च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलून तो जुलैमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

आनंद कुमार यांनी 'अभयानंद' ही प्रशिक्षण संस्था सुरू केली आणि दरवर्षी आर्थिक मागास वर्गातील ३० गुणवान विद्यार्थ्यांना त्यांनी 'जे ईई' ही कठीण परीक्षा पार करण्यास मार्गदर्शन केले. या कथेवर 'सुपर ३०' हा चित्रपट आधारित आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hrithik Roshan confirms July 26 as Super 30 release date