Hrithik Roshan: 'अरे आवरा जरा', एयरपोर्टवर लिपलॉक करताना दिसले हृतिक-सबा, व्हिडीओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hrithik roshan and saba azad

Hrithik Roshan: 'अरे आवरा जरा', एयरपोर्टवर लिपलॉक करताना दिसले हृतिक-सबा, व्हिडीओ व्हायरल

हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार हृतिक रोशनला वेगळ्या ओळखीची गरज नाही. सध्या हृतिक रोशन त्याच्या आगामी चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. दरम्यान, हृतिक रोशनचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये हृतिक एअरपोर्टवर त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री सबा आझादला ओठांवर किस करताना दिसत आहे. हृतिक आणि सबाचा हा रोमँटिक व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.

इन्स्टंट बॉलीवूडने सोमवारी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये हृतिक रोशन आणि सबा आझाद एकाच कारमधून मुंबई विमानतळावर आल्याचे तुम्ही पाहू शकता.

यानंतर हृतिक त्याची लेडी लव्ह सबाला लिप लॉक करताना दिसत आहे. त्यानंतर हृतिक रोशन सबाला सी ऑफ करून विमानतळाकडे चालत जाताना दिसत आहे.

सबा आझाद तिचा बॉयफ्रेंड हृतिक रोशनला विमानतळावर सोडण्यासाठी आल्याचा अंदाज या व्हिडिओवरून लावता येतो. हृतिक रोशन आणि सबा आझादचा हा किसिंग व्हिडिओ सोशल मीडियावर आगीसारखा व्हायरल होत आहे. हृतिक रोशन आणि सबाच्या या रोमँटिक व्हिडिओला चाहते प्रचंड लाइक आणि कमेंट करत आहेत.

गेल्या वर्षी हृतिक रोशनने 'विक्रम वेधा' चित्रपटाद्वारे पुनरागमन केले आहे. हृतिकचा हा चित्रपट फ्लॉप ठरला. यानंतर हृतिक रोशनचे चाहते त्याच्या आगामी 'फायटर' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हृतिक रोशनचा 'फाइटर' हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे जो पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशनसोबत बॉलिवूड सुपरस्टार दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत आहेत.