IIfa 2023 Hrithik Roshan: हृतिक रोशन स्टेजवर आला आणि पुढे जे झालं ते पाहून तुम्हीही भारावून जाल.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IIfa 2023, IIfa 2023 news, hrithik roshan at iifa 2023

IIfa 2023 Hrithik Roshan: हृतिक रोशन स्टेजवर आला आणि पुढे जे झालं ते पाहून तुम्हीही भारावून जाल..

IIFA 2023 Hritik Roshan News: सध्या अबू धाबीमध्ये 23 व्या IIFA पुरस्कारांची सुरुवात झाली आहे. सर्व बॉलीवूड स्टार्सनी या कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शवुन चार चांद लावले आहेत.

या वर्षी सर्व स्टार्स अवॉर्ड्समध्ये आपल्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांना थक्क करणार हे काही वेगळ सांगायची गरज नाही.

या कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. याच कार्यक्रमातील हृतिक रोशनचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय.

(Hrithik roshan Vicky kaushal and Abhishek bachchan share the stage as they perform to Ek Pal Ka Jeena from KNPH at iifa 2023 )

हृतिक रोशनला या कार्यक्रमात विक्रम वेधा सिनेमासाठी बेस्ट अभिनेता म्हणून IIFA पुरस्कार मिळाला.

यावेळी हृतिक जेव्हा स्टेजवर पुरस्कार घेण्यासाठी आला तेव्हा IIFA होस्ट करणारे अभिनेते विकी कौशल आणि अभिषेक बच्चन यांनी हृतिकला बोलावलं.

आणि हृतिकला त्याच्या गाजलेल्या एक पल का जिना या गाण्यावर डान्स करायला सांगितला.

मागे गाणं वाजायला सुरु झालं. हृतिक स्टेप आठवत होता. आणि अचानक हृतिकने त्याच्या गाजलेल्या घेण्याच्या स्टेप्स करायला सुरुवात केली.

हृतिक असा काहो नाचला की सर्वजण पाहतच राहिले. हृतिकची एनर्जी, त्याच्या डान्स स्टेप्स बघून सर्वजण थक्क झाले.

विकी आणि अभिषेकने हृतिकच्या डान्स स्टेप्स फॉलो करायचा प्रयत्न केला. पण हृतिक सारखी नजाकत त्यांच्यात नव्हती.

हृतिकने जेव्हा नाचायला सुरुवात केली तेव्हा उपस्थित प्रेक्षकांनी दिलखुलास आवाजात ह्रतिकला दाद दिली.

शेवटी हृतिक नाचल्यावर विकी त्याच्यासमोर झुकला आणि त्याच्या या सळसळत्या एनर्जीला खाली झुकून मानवंदना दिली. दरम्यान हृतिकला विक्रम वेधा सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून IIFA 2023 पुरस्काराने गौरवण्यात आले.

इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्स 2023 च्या सिनेमॅटोग्राफी, पटकथा, संवाद आणि संपादन या तांत्रिक विभागातील पुरस्कारांची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. तर मुख्य कार्यक्रम शनिवारी होणार आहे.

यावेळी IIFA अवॉर्ड्समध्ये सर्वात जास्त गंगूबाई काठियावाडी आणि भूल भुलैया 2 या चित्रपटांनी कार्यक्रमात अनेक श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकला आहे.