esakal | 'ऋतिकनं कौतूक केलं, मेरा तो दिन ही बन गया गुरुजी' 
sakal

बोलून बातमी शोधा

tiger shroff news of hritik

टायगरचं कॅसिनोवा नावाचा एक डान्स व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

'ऋतिकनं कौतूक केलं, मेरा तो दिन ही बन गया गुरुजी' 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडमध्ये जे प्रसिध्द डान्सर आहेत त्यात ऋतिकचा नंबर फार वरचा आहे. मात्र त्याला आव्हान देणारा आणखी एक डान्सर बॉलीवूडमध्ये आहे त्याचे नाव टायगर श्रॉफ. लहानपणापासून ऋतिकचा फॅन आणि त्याला गुरु मानणा-या टायगरचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ त्याच्या डान्सचा आहे.

अभिनेता ऋतिक रोशनने टायगरच्या डान्सचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन शेयर केला आहे. त्यानंतर टायगरच्या आनंदाला पारावार राहिला नाही. सध्या टायगरचा तो व्हिडिओ भलताच व्हायरल झाला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी टायगरचा मायकेल जॅक्सनला आदरांजली म्हणून एक डान्स व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यालाही टायगरच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. टायगर आणि ऋतिकच्या डान्समध्ये नेहमी तुलना होत असते. त्यावरुन दोघांच्या फॅन्समध्ये एकमत पाहायला मिळत नाही. यासगळ्यात टायगर मात्र ऋतिकला आपला गुरु मानतो.

टायगरचं कॅसिनोवा नावाचा एक डान्स व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला आहे. टायगरच्या इंस्टा अकाऊंटवर असलेला हा व्हिडिओ ऋतिकनं आपल्या अकाऊंटवरुन शेयर केला आहे. इतकेच नव्हे तर त्याच्या या डान्सचे कौतूकही केले आहे. जेव्हा साक्षात ऋतिकनं आपलं कौतूक केले आहे असे त्याला कळाल्यावर त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यामुळे भावूकही झाला. त्याने आणखी एक फोटो शेयर करुन त्यावर एक कमेंटही लिहिली आहे. तो म्हणाला, वाह मेरा तो दिन ही बन गया गुरुजी. दोघांच्या चाहत्यांनी या प्रतिक्रियेवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.

 बॉलीवूडमध्ये सध्याच्या घडीला ऋतिक रोशनला डान्ससाठी आव्हान देणारा एकच अभिनेता आहे तो म्हणजे टायगर श्रॉफ. प्रेक्षकही टायगरच्या डान्सला अधिक पसंद करतात. ऋतिकला जन्मदिनाच्या शुभेच्छा देताना टायगरनं तो आपला गुरु असल्याचे सांगितले होते. मागील वर्षी या दोघांचा एकत्रित असणारा चित्रपट वॉर प्रदर्शित झाला होता. मात्र त्याला अपेक्षापेक्षा जास्त यश मिळाले नाही. मात्र यातील एका गाण्यात नाचताना टायरगनं  ऋतिकला आव्हान दिले होते.