हृतिक रोशनने त्याच्या डान्स स्टाईलबद्दल केला मोठा खुलासा, म्हणाला 'जेव्हा मी...' Hrithik Roshan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hrithik Roshan

Hrithik Roshan: हृतिक रोशनने त्याच्या डान्स स्टाईलबद्दल केला मोठा खुलासा, म्हणाला 'जेव्हा मी...'

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन अभिनयासोबतच डान्ससाठीही ओळखला जातो. तो प्रत्येक डान्स स्टाईलमध्ये परफेक्ट आहे. हृतिकच्या डान्स स्टाइल आणि स्टेप्स पाहून प्रेक्षक वेडे होतात.

आता अभिनेत्याने त्याच्या डान्स स्टाईलबद्दल सांगितले आणि पार्टनर डान्स स्टाईल शिकण्याची इच्छा व्यक्त केली. अभिनेता म्हणतो की तो डान्समध्ये चांगला असला तरी त्याचे पार्टनर वर्क खूपच खराब आहे.

डान्सबद्दल बोलताना हृतिक रोशन म्हणाला की, जेव्हा मी एकटा डान्स करतो तेव्हा मला आराम वाटतो, छान वाटतं, पण जेव्हा पार्टनर वर्क असतं तेव्हा त्यात समन्वयाची गरज असते, पण हे कौशल्य मी कधीच मिळवू शकलो नाही. मला ते शिकायचे आहे.'

चित्रपटांमधील त्याच्या डान्सच्या स्टेप्सबद्दल बोलताना, हृतिकने खुलासा केला की त्याला 'गुजारिश'मध्ये डान्स फॉर्मसाठी ट्रेनिंग घेण्याची संधी मिळाली आणि हा एक अविश्वसनीय अनुभव होता. टेक दरम्यान, मला तीन टर्न घेता आले नाहीत. त्यानंतर आम्ही पुन्हा प्रयत्न केला, नंतर ते एकाच टेकमध्ये झाले.'

माझ्या संपूर्ण कारकिर्दीतील सिग्नेचर डान्स स्टेप्समध्ये 'बँग बँग टायटल ट्रॅक', 'वॉर'मधील 'घुंगरू' आणि 'कोई मिल गया'मधील 'इट्स मॅजिक' यांचा समावेश आहे, असे हृतिकने सांगितले.

हृतिक रोशन त्याच्या कामाच्या पद्धतीबद्दल बोलत असताना म्हणाला, हृतिक रोशनने खुलासा केला की तो चित्रपटांमधील डान्स सॉंगसाठी रिहर्सल करण्यासाठी वेळ काढतो. गाण्याच्या रिहर्सलसाठी तो अनेकदा एक ते दोन महिने मागतो. 'मैं ऐसा हूं'मध्ये प्रभूदेवाने त्याला एक महिन्याची वेळ दिल्याचा खुलासा त्याने केला. अशाच एका चित्रपटादरम्यान संजय लीला भन्साळी यांनी त्याला दोन महिन्यांचा वेळ दिला होता.