आता फक्त लग्न व्हायचचं बाकी! हृतिकच्या घरच्या पार्टीत आली 'सबा'

बॉलीवूडचा क्रिश, अॅक्शन हिरो म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या हृतिक रोशनच्या नव्या रिलेशनशिप सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत (Bollywood Viral News) आहे.
Hrithik Roshan Saba Azad Roshan family photo
Hrithik Roshan Saba Azad Roshan family photo esakal

Bollywood News: बॉलीवूडचा क्रिश, अॅक्शन हिरो म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या हृतिक रोशनच्या नव्या रिलेशनशिप सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत (Bollywood Viral News) आहे. त्याच्या नव्या मैत्रीणीचं नाव सबा आझाद असं आहे. गेल्या काही दिवसांपासून सबा आणि हृतिक हे एकमेकांना डेट करत (Hrithik Roshan) असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. हृतिक आणि सुझैन यांच्यातील घटस्फोटानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेला उधाण आले होते. हृतिक (Saba Azad) हा कुणाला डेट करतो आहे त्याच्या नव्या गर्लफ्रेंडचे नाव काय असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता. रॉकेट बॉईजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या सबा आझादच्या त्या मालिकेतील भूमिकेचं प्रेक्षकांनी कौतुक केलं होतं. त्यानंतर ती पुन्हा चर्चेत आली ते हृतिक सोबत तिचं नाव जोडलं गेल्यानं. आता ती हृतिकच्या परिवारातील एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंटस दिल्या आहेत.

2014 मध्ये हृतिक आणि सुझैन हे वेगळे झाले. त्यांना दोन मुलं आहे. हृतिक अनेकदा सोशल मीडियावर त्यांच्यासोबतचे फोटो व्हायरल करत असतो. दुसरीकडे सुझैन खान ही अर्सलान गोनीला डेट करत असल्याचे दिसून आले आहे. यावेळी ते गोव्यामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. त्याचे काही फोटोही व्हायरल झाले आहेत. आता सोशल मीडियावर सबा आझाद ही हृतिक रोशनच्या कुटूंबातील एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे. एका युझर्सनं तिला आता तुझं फक्त लग्न होणं बाकी असून आम्हाला गोड बातमीची उत्सुकता आहे. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Hrithik Roshan Saba Azad Roshan family photo
Hrithik Roshan: विक्रम वेधाचा कडक लूक गर्लफ्रेंडची ढिंनच्यॅक कमेंट

यापूर्वी देखील हृतिक आणि सबाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दुसरीकडे सबानं जाहिररित्या हृतिकच्या आणि तिच्या रिलेशनशिपविषयी एक पोस्टही केली होती. त्याकडे नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले होते. रोशन कुटूंबियांच्या वतीनं आयोजित केलेल्या एका डिनर पार्टीमध्ये सबा सहभागी झाली होती. एकानं त्या फोटोवर कमेंट केली आहे की, किती सुंदर कुटूंब आहे. आता तुम्ही लवकर लग्न करुन नेटकऱ्यांना खुशखूबर द्या. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल होताना दिसत आहे. हृतिक हा त्याच्या आगामी विक्रम वेधा या चित्रपटामुळे जास्त चर्चेत आला आहे.

Hrithik Roshan Saba Azad Roshan family photo
Video Viral: कंगनाचा नादच नाय! नाकाला जीभ लावून अनन्याची उडवली खिल्ली...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com