हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफमध्ये होणार 'वॉर'

हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफमध्ये होणार 'वॉर'

मुंबईः हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ या दोघांची ऑनस्क्रीन अॅक्शन आता चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 'वॉर' या चित्रपटात हे दोन स्टार्स एकमेकांना भिडणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. 

हृतिक आणि टायगरच्या चाहत्यांना दोघांना चित्रपटात एकत्र काम करताना पाहण्याची संधी मिळणार आहे. हा चित्रपट अॅक्शन, सुंदर लोकेशन यांचं पॅकेज असेल. हॉलिवूडच्या तोडीस तोड असा या चित्रपटाचा टीझर आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सिनेमाविषयी 'टायगर व्हर्सेस हृतिक' असा ट्रेंड सुरु होता. त्यामुळं चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली होती. कशामुळं या ट्रेंड सुरू आहे हा अंदाज प्रेक्षकांना बांधता येत नव्हता. अखेर चाहत्यांना या टीझरमुळं त्याचं उत्तर मिळालं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com