Hrithik Roshan: हृतिक रोशनचा फिटनेस पाहून चाहते हैराण! शेअर केले थक्क करणारे फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hrithik Roshan

Hrithik Roshan: हृतिक रोशनचा फिटनेस पाहून चाहते हैराण! शेअर केले थक्क करणारे फोटो

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सोशल मीडियावर सतत अ‍ॅक्टिव्ह असतो. अभिनेता हृतिक रोशनने नवीन वर्षाच्या सुरुवातीला चाहत्यांना खास ट्रीट दिली आहे. हृतिक रोशनचा बॉलिवूडमध्ये सर्वांत फिट अभिनेता म्हणून उल्लेख केला जातो. अलीकडेच हृतिक रोशनच्या अशाच एका पोस्टने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. हृतिकने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हृतिकने ऑलराइट.. लेट्स गो’ असे कॅप्शन देत हे फोटो पोस्ट केले आहेत. वयाच्या 48 व्या वर्षी हृतिक रोशनचे फिटनेस आणि ॲब्स पाहून चाहते थक्क झाले आहेत.

हृतिक रोशन या फोटोंमध्ये टी-शर्ट वर घेऊन त्याचे 6 पॅक ॲब्स दाखवताना दिसत आहे. हृतिकचे सुपर टोन्ड ॲब्स आणि फिटनेस पाहून चाहते थक्क झाले आहेत. हृतिक रोशनने पोस्ट केलेल्या फोटोंवर सर्वसामान्य चाहत्यांसोबतच बॉलिवूड सेलिब्रिटींकडून देखील लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. हृतिक रोशनच्या पोस्टवर ‘जुना हृतिक परतलाय’ असे एका युजरने लिहिले आहे. तर ‘हृतिकच्या ॲब्सलाही ॲब्स आहेत’, असे दुसऱ्या युजरने लिहिले आहे. तसेच एका नेटकऱ्याने ‘मला फक्त तुझे दोन ॲब्स देशील का’, अशी विनोदी कमेंट केली आहे.

हेही वाचा: Tunisha Death Case : 'कोण मामा, कुठला मामा तो तर....' शिझानच्या बहिणीचा मोठा गौप्यस्फोट

काही दिवसांपूर्वी हृतिकचा ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हृतिकच्या विक्रम वेधा या चित्रपटाला प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. हृतिकने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत यावर भाष्य केले आहे.

हृतिक म्हणाला “जेव्हा लोक माझे कौतुक करतात, तेव्हा मला खूप छान वाटते. मी केलेल्या कामाचे कौतुक झालेले मला फार आवडते. पण लोकांच्या त्यासोबत येणाऱ्या ज्या अपेक्षा असतात, त्या मला ओझं वाटतात. मला चुकीचे समजू नका. हे एक असे ओझे आहे, ज्याला मी उचलून चालतोय, असे मला वाटते. हे ओझे कायम डोक्यावर ठेवण्यासाठी मला सतत कठोर मेहनत करावी लागेल. तुमच्याकडून जेव्हा कोणी अपेक्षा ठेवत नाही, तेव्हा तुम्ही खूप सुखी असता”, असे हृतिक म्हणाला.

हृतिक रोशन सध्या आगामी ‘फायटर’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. हृतिक रोशनचा फायटर हा चित्रपट पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच हृतिक आणि दीपिकासोबतच या चित्रपटामध्ये अनिल कपूरचीही भूमिका आहे.