Krrish 4 Hrithik Roshan: दिल थाम के बैठे..! हृतिक रोशनचा क्रिश ४ येतोय, समोर आली मोठी अपडेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

krrish 4, hrithik roshan, krrish 4 update, war, fighter, war 2

Krrish 4 Hrithik Roshan: दिल थाम के बैठे..! हृतिक रोशनचा क्रिश ४ येतोय, समोर आली मोठी अपडेट

Krrishh 4 Hrithik Roshan News: हृतिक रोशनचा विक्रम वेधा सिनेमा गेल्या वर्षी २०२२ ला दिवाळीत रिलीज झाला. सिनेमात हृतिकच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. पण सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी केली नाहीये.

आता हृतिकच्या फॅन्सनी निराश होण्याचं काहीही कारण नाही. हृतिकचा गाजलेला आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व ज्या सिनेमाचे फॅन्स आहेत अशा क्रिश ४ सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. क्रिश ४ ची वाट बघणाऱ्या सर्व जनतेसाठी आनंदाची बातमी..

(Hrithik Roshan's Krrish 4 is coming, a big update has come out)

गेले अनेक दिवस Krrish 4 सिनेमाबद्दल काहीच चर्चा नव्हती. इतकंच नव्हे, तर हृतिक रोशनचा Krrish 4 चं शूटिंग पुन्हा ट्रॅकवर आला आहे, पुढील वर्षी WAR 2 नंतर शूटिंग सुरू होईल.

सिद्धार्थ आनंद निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन अग्निपथ फेम करण मल्होत्रा ​​करणार आहे. त्यामुळे हृतिकच्या फॅन्सना खूप आनंद झालाय. त्यामुळे पुन्हा एकदा Krrish 4 ची जादू पुन्हा अनुभवता येणार आहे.

हृतिक रोशनने जानेवारी महिन्यात माध्यमांशी बोलताना क्रिश ४ बद्दल मोठी गोष्ट सांगितली. "क्रिश ४ बद्दल सर्व गोष्टी ठरल्या आहेत. शुटिंगचं काम सुद्धा पूर्ण झालंय. फक्त टेक्निकल माध्यमांवर काम करणं बाकी आहे. काही अडचणी दूर करायच्या आहेत.

अशा सर्व गोष्टींवर काम झालं की, २०२३ च्या अखेरीस सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकेल" असा खुलासा हृतिकने केलाय.

त्यामुळे एकूणच क्रिश ४ लांबणीवर गेला असून चाहत्यांना सिनेमाची आणखी वाट बघावी लागण्याची शक्यता होती. पण नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार वॉर २ चं शूटिंग जसं होईल तसं हृतिक क्रिश ४ च्या शूटिंगला सुरुवात करेल.

हृतिकने 2022 मध्ये रिलीज झालेल्या 'विक्रम वेधा'या सिनेमात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

याशिवाय हृतिक रोशन आता भारतातील पहिला एरिअल ॲक्शन एंटरटेनर सिनेमा 'फाइटर'सह प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज आहे.

यात हृतिकसोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण झळकणार आहे. आता हृतिकचा क्रिश ४ बॉक्स ऑफिसवर काय धुमाकूळ घालणार आणि सिनेमात आणखी कोणते कलाकार झळकणार याची सर्वांना उत्सुकता आहे.