हृतिक रोशनने लाँच केला ‘हृदयांतर’ सिनेमाचा ट्रेलर!

टीम ई सकाळ
सोमवार, 29 मे 2017

हृतिकने ह्या सिनेमाच्या रिलीजची तारीखही ट्विटरव्दारे जाहिर केली होती. आणि आता रविवारी मुंबईमध्य़े झालेल्या दिमाखदार सोहळ्याला स्वखुशीने हजेरी लावून हृतिकने ह्या सोहळ्याची शान वाढवली आणि ट्रेलर लाँच केला.

मुंबई :‘हृदयांतर’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणा-या सुपरस्टार हृतिक रोशनने नुकताच ह्या सिनेमाचा ट्रेलर लाँच केला.‘हदयांतर’ सिनेमाव्दारे फॅशन डिझाइनर विक्रम फडणीस मराठी सिनेसृष्टीत निर्माता-दिग्दर्शक म्हणून आपलं पहिलं पाऊल ठेवतोय. त्यामुळे आपल्या मित्राच्या सिनेमात काम करताना हृतिक रोशन खूप खुश आहे.

हृतिकने ह्या सिनेमाच्या रिलीजची तारीखही ट्विटरव्दारे जाहिर केली होती. आणि आता रविवारी मुंबईमध्य़े झालेल्या दिमाखदार सोहळ्याला स्वखुशीने हजेरी लावून हृतिकने ह्या सोहळ्याची शान वाढवली आणि ट्रेलर लाँच केला.

सुपरस्टार हृतिक रोशन आणि विक्रम फडणीस ह्यांची मैत्री खूप जुनी आहे. आणि त्या मैत्रीखातरच हृतिक पहिल्यांदाच एका मराठी चित्रपट सोहळ्यात दिसला

यावेळी हृतिक म्हणाला, "ही फिल्म जेव्हा माझ्याकडे आली, तेव्हा मी दूस-या एका प्रोजेक्टवर काम करत होतो. पण विक्रमने जेव्हा मला चित्रपटाचा विषय ऐकवला. तेव्हा माझं लक्ष ह्या फिल्मकडे वेधलं गेलं. हा हृदयांतर चित्रपट विक्रमचं हृदय आहे. आणि ह्या चित्रपटाव्दारे मला उत्म कलाकारांसोबत काम करायची संधी मिळाल्याबद्दल मी विक्रमचा आभारी आहे."

विक्रम फडणीस म्हणतो, “हृतिक रोशन ह्या सिनेमाचा हिस्सा असणं, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि हृतिक नेहमीच या ना त्या प्रकाराने हृदयांतरच्या पाठीशी उभा राहिलाय. त्यामुळेच हृतिकच्या हस्ते हृदयांतर चित्रपटाचा ट्रेलर लाँच होणं ही आमच्या संपूर्ण हृदयांतरच्या टीमसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. हा आमच्यासाठी नेहमीच एक स्पेशल दिवस असणार आहे.”

गुलशन कुमार प्रस्तुत, यंग बेरी एन्टरटेन्मेट, इम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या, आणि टोएब एन्टरटेन्मेटच्या सहयोगाने बनलेल्या विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे आणि सोनाली खरे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 7 जुलैला सर्वत्र प्रदर्शित होतोय.

Web Title: Hritik Roshan Hridayantar Entertainment esakal news